Post Pregnancy  google
लाइफस्टाइल

Post Pregnancy : बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल ?

बरेचदा गर्भधारणेनंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढते. तसेच पोटावर स्ट्रेच मार्क देखील येतात. प्रसूतीनंतर महिलांना अनेकदा पोटावर चरबीची समस्या असते.

नमिता धुरी

मुंबई : आई होण्याचा काळ हा फार सुखद असतो परंतु, गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यात तिचा संपूर्ण दिवस जातो ज्यामुळे तिला स्वत:च्या आरोग्याकडे हवे तसे लक्ष देता येत नाही.

बरेचदा गर्भधारणेनंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढते. तसेच पोटावर स्ट्रेच मार्क देखील येतात. प्रसूतीनंतर महिलांना अनेकदा पोटावर चरबीची समस्या असते. अनेक स्त्रिया प्रसूतीनंतर त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात आणि त्यातून सुटका करून घेतात, परंतु काहींना ही समस्या दीर्घकाळ असते. अशा स्थितीत या समस्येतून सुटका कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रसूतीनंतर पोटातील चरबीची समस्या

गर्भधारणेदरम्यान, महिलांच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. प्रसूतीनंतरही गर्भाशयाचा आकार वाढतच राहतो त्यामुळे पोट फुगलेले दिसते. वेळेत व्यायाम आणि योग्य खाण्याच्या सवयी लागल्यास हळूहळू पोट कमी होत जाते. या प्रक्रियेला इन्व्हॉल्यूशन म्हणून ओळखले जाते. हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

प्रसूतीनंतर पोटाची चरबी कशी कमी करावी ?

  • गर्भधारणेच्या दोन दिवसांनंतरच तुम्ही हलका व्यायाम सुरू करू शकता. याला आयसोमेट्रिक आकुंचन असे म्हटले जाते.

  • हा व्यायाम केल्याने ओटीपोटाचा भाग, पोट आणि पाठीचा खालचा भाग मजबूत होतो.

  • असे व्यायाम प्रसूतीच्या 4 ते 6 आठवड्यांनंतरच सुरू करता येतात. जेणेकरून तुमच्या शरीरावर कोणताही दबाव येणार नाही.

  • बहुतेक व्यायामांसाठी, पाठीचा, ओटीपोटाचा आणि पोटाचा वर उल्लेख केलेला हलका व्यायामच करा. तुम्ही शरीर आणि मान ताणणारे व्यायाम देखील करू शकता.

  • व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. आठवड्यातून 2-3 वेळा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या व्यायामासोबतच शरीर स्ट्रेच करण्यावर भर द्या.

  • व्यायामासोबतच चालणेही खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या आणि आहाराची विशेष काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT