लाइफस्टाइल

झूम : अल्ट्रोझ ‘डिसीए’, स्मार्ट, दमदार

ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचे (एनसीएपी) ५-स्टार रेटिंग मिळवून भारतातील सर्वांत सुरक्षित हॅचबॅक ठरलेली टाटाची ‘अल्ट्रोझ’ कार आता ‘डीसीए’ अर्थात ड्युअल क्लच ऑटोमॅटिक या प्रकारात नुकतीच दाखल करण्यात आली.

प्रणीत पवार

ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचे (एनसीएपी) ५-स्टार रेटिंग मिळवून भारतातील सर्वांत सुरक्षित हॅचबॅक ठरलेली टाटाची ‘अल्ट्रोझ’ कार आता ‘डीसीए’ अर्थात ड्युअल क्लच ऑटोमॅटिक या प्रकारात नुकतीच दाखल करण्यात आली.

ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचे (एनसीएपी) ५-स्टार रेटिंग मिळवून भारतातील सर्वांत सुरक्षित हॅचबॅक ठरलेली टाटाची ‘अल्ट्रोझ’ कार आता ‘डीसीए’ अर्थात ड्युअल क्लच ऑटोमॅटिक या प्रकारात नुकतीच दाखल करण्यात आली. ही कार जानेवारी २०२०मध्ये प्रथम भारतात आली, मात्र दोन वर्षांनंतर तिचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट टाटाने बाजारात आणले. या कारची नुकताच राईड घेतली व तिने नाराज केले नाही. विशेषत: महामार्गावर या कारच्या पूर्ण ताकदीचा अंदाज आला. या कारबद्दल...

अल्ट्रोझ ‘डिसीए’मध्ये टाटाने गिअर बॉक्सव्यतिरिक्त विशेष बदल केलेले नाहीत. फक्त ‘ओपेरा ब्ल्यू’ हा रंग वाढवला आहे. १६ इंची टायर आणि १६५ मिलिमीटरच्या ग्राउंड क्लिअरन्समुळे ही कार पूर्ण आसनक्षमतेतही खड्डेमय रस्ते किंवा गतिरोधकावर आदळणार नाही, याची खात्री मिळते. या कारचे सर्व दरवाजे ९० अंशामध्ये उघडत असल्याने वयस्क व्यक्तीला कारमध्ये बसताना अडथळा येत नाही.

अल्ट्रोझ डीसीएला एक्सलरेशन दिल्यानंतर वेग पकडण्यास इतर ऑटोमॅटिक कारच्या तुलनेत थोडा अधिक वेळ लागतो, मात्र वेग पकडल्यानंतर कारची कामगिरी लक्षात येते. स्टिअरिंग, ब्रेकिंग सिस्टिम, रस्त्यावरील पकड, सस्पेन्शन, वातानुकूलन यंत्रणा, बूट स्पेस व आसन व्यवस्थेकडे ‘टाटा’ कटाक्षाने लक्ष देत असल्याने दिसते. अल्ट्रोझमधील ‘हारमन’ची साऊंड सिस्टिम दमदार आहे. राईडमध्ये कारने सरासरी ११ ते १४ किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज दिला. इंजिन अधिक रिफाईन झाल्यानंतर यात वाढ होऊ शकते. एकूणच प्रीमिअम हॅचबॅक ऑटोमेटिक ट्रान्समिशन प्रकारात अल्ट्रोझच्या एन्ट्रीने चांगला पर्यायही उपलब्ध झाला आहे.

इंजिन, व्हेरिएंट आणि किंमत

अल्ट्रोझ डीसीएमध्ये ६ स्पीड ट्रान्समिशन, ११९९ सीसी, १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिले असून, ते ८५ बीएच पॉवरला ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये एक्सएम प्लस, एक्सटी, एक्सझेड, एक्सझेड प्लस आदी चार व्हेरिएंट दिले आहेत. शिवाय एक्सटी, एक्सझेड प्लस व्हेरिएंटमध्ये ‘डार्क’ थीमचाही पर्याय दिला आहे. या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत ८,०९,९०० ते ९,८९,९०० दरम्यान आहे.

अल्ट्रोझ ‘डीसीए''ची वैशिष्ट्ये

1) वेट क्लच विथ ॲक्टिव्ह कुलिंग टेक्नॉलॉजी : या तंत्राद्वारे कारमधील ऑईलची तापमान वाढ नियंत्रित ठेवण्याचे काम केले जाते. ॲक्टिव्ह कुलिंग टेक्नॉलॉजी ही भारतातील रस्ते, वाहन चालवण्याच्या पद्धती आणि वातावरणानुसार अधिक फायदेशीर ठरते.

2) मशिन लर्निंग : टाटा मोटर्सने अल्ट्रोझ डीसीएमध्ये मशिन लर्निंग तंत्राचा वापर केला आहे, जो ऑटोमॅटिक गिअर शिफ्टिंगसाठी फायदेशीर ठरतो. यात चालकाच्या हालचाली, रस्त्याचा प्रकार किंवा परिस्थिती ओळखून गिअर बदलतात. धक्कामुक्त प्रवासासाठी हे तंत्र फायदेशीर आहे.

3) शिफ्ट बाय वायर टेक्नॉलॉजी : गिअर किंवा ड्रायव्हिंग मोड बदलताना यांत्रिक घटकाचा वापर होत नाही. म्हणजेच पार्क, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि रिव्हर्स गिअरमधील बदल हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. हे तंत्र गिअर वाढवल्यानंतर कारला वेग पकडण्यास मदत करते.

4) ऑटो पार्क लॉक : कार थांबवल्यानंतर आपण ती पार्किंग मोडमध्ये ठेवण्यास विसरतो. ड्रायव्हिंग मोडलाच राहिल्याने कार पुढे जाण्याची शक्यता असते. अशावेळी ऑटो पार्क लॉक तंत्र स्मार्ट पद्धतीने कारला पार्क मोडमध्ये आणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT