Astor Car
Astor Car Sakal
लाइफस्टाइल

झूम : एस्टर : सुरक्षेची आधुनिक परिभाषा

प्रणीत पवार

एमजी अर्थात ‘मॉरिस गॅरेजेस’ कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्ये ‘एस्टर’ ही भारतातील पहिली ‘पर्सनल एआय असिस्टन्ट’ कार लाँच केली.

एमजी अर्थात ‘मॉरिस गॅरेजेस’ कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्ये ‘एस्टर’ ही भारतातील पहिली ‘पर्सनल एआय असिस्टन्ट’ कार लाँच केली. लूक आणि सर्वच बाबतीत ‘डिसेंट’ वाटणाऱ्या ‘एस्टर’मधील आर्टिफिशियल इंटिलिजन्स, एडास हे आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष जाणून घेण्याची उत्सुकता होती. या कारची राइड केल्यानंतर ही कार अधिक सुरक्षित प्रवास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची नवी परिभाषा सांगते.

एमजी एस्टरमध्ये सध्याच्या स्मार्ट युगाच्या अनुषंगाने बरीचशी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. या कारच्या बाहेरील आरशांच्या खालच्या बाजूला ‘ब्रिट डायनानिक’चा लोगो दिसून येतो. त्याचा अर्थ ही एक थीम असून, ज्यावर या कारच्या इंटिरिअरची रचना करण्यात आली आहे. एस्टरचे इंटिरिअर आकर्षक आहे. एखाद्या स्पोर्ट्स कारमध्ये बसल्याचा फिल येतो; परंतु कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्सची उणीव जाणवते. रिअर व्ह्यू मिररदेखील मॅन्युअल दिले आहे, जे ऑटोमेटिक देण्याची गरज वाटते.

भलामोठा पॅनोरमिक सनरूफ हे कारचे आणखी एक वैशिष्ट्य. कारमध्ये पुरेशी जागा असल्याने प्रवास आरामदायी होण्याची खात्री मिळते. कारचे स्टेअरिंग एकदम स्मूथ असून यात ‘टिल्ट’चा पर्याय दिला आहे, ज्याद्वारे स्टेअरिंग खाली वर करू शकतो; परंतु ‘टेलिस्कोपिक’चा पर्याय न दिल्याने ती उंचीनुसार ॲडजस्ट करता येत नाही. एस्टर तिच्या गोलाकारामुळे स्पोर्टिव्ह दिसते. एस्टरच्या चारही चाकांना डिस्क ब्रेक दिले आहेत आणि ही चाके अधिक स्पोर्टिव्ह दिसण्यासाठी चारही ब्रेकचे कॅलिबर लाल रंगात दिले आहेत.

ब्रॉड टायर, उत्तम हॅण्डलिंग

एस्टरच्या ‘२२० टर्बो ६ एटी सॅव्ही रेड’ या टॉप व्हेरिएंटची राइड केली. कार चालवण्यासही तितकीच स्मूथ आहे. अन्य कार ॲक्सिलरेशन दिल्यावर पिकअप घेतात आणि कारमधील प्रवाशांना झटका जाणवतो, तसा झटका एस्टरमध्ये अजिबात जाणवत नाही. भारतीय रस्त्यांच्या हिशेबाने कारला पुरेसा ग्राऊंड क्लिअरन्स दिला आहे. हँडलिंगला ही कार उत्तम आहे, ब्रॉड टायरमुळे रस्त्यांवर चांगली पकड ठेवून ही कार धावते. शहरी रस्त्यांवर ही कार ११ ते १३, तर महामार्गावर वेगमर्यादा पाळल्यास १४ ते १५चे मायलेज आरामात देते. कारचे सस्पेन्शन चांगल्या दर्जाचे असल्याने खड्ड्यात किंवा गतिरोधकावरही धक्का बसत नाही.

‘एआय’सह आधुनिक फीचर्स

एस्टरमधील पर्सनल एआय असिस्टंट हिंग्लिश भाषेसह १०० हून अधिक कमांडवर काम करते. यात बॉश कंपनीने तयार केलेले एडास तंत्रज्ञान वापरले आहे. हे रडार असून, रस्त्यांवरील धोक्यांबाबत चालकाला सतर्क करते. एस्टरमध्ये ‘ऑटोनॉमस लेव्हल-२’ तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. रिअर ड्राइव्ह असिस्ट (ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, रिअर क्रॉस ट्राफिक ॲलर्ट), ऑटोमेटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, समोरून टक्कर होण्याच्या परिस्थितीत माहिती देणे (फ्रंट कॉलिशन वॉर्निंग), इंटेलिजंट हेडलॅम्प कंट्रोल, ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन फंक्शन, स्पिड असिस्ट सिस्टिम यासारखे अनेक आधुनिक फीचर्स एस्टरमध्ये दिले आहेत.

स्पेसिफिकेशन

  • इंजिन : व्हीटी आय- टेक(१४९८ सीसी), २२० टर्बो (१३४९ सीसी)

  • ट्रान्समिशन : ५ एमटी, ८ सीव्हीटी, ६ एटी

  • व्हेरिएंट : स्टाईल, सुपर, स्मार्ट, शार्प, सॅव्ही (एकूण १८)

  • किंमत : १०.५२ ते १८.४२ लाख (एक्स शोरूम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT