Camry Car
Camry Car Sakal
लाइफस्टाइल

झूम : कॅमरी हायब्रिडची ‘लंबी रेस’

प्रणीत पवार

आपल्याकडे ४०-५० लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या लक्झरियस कार वापरणारे सहसा कारच्या मायलेजचा विचार करत नाहीत. अशी लक्झरियस कार त्यांचे स्टेट्स सिम्बॉल’ असते.

आपल्याकडे ४०-५० लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या लक्झरियस कार वापरणारे सहसा कारच्या मायलेजचा विचार करत नाहीत. अशी लक्झरियस कार त्यांचे स्टेट्स सिम्बॉल’ असते. टोयोटाची ‘कॅमरी हायब्रिड’ ही लक्झरियस कार स्वत:चे स्टेट्स जपणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही कार मायलेजमध्ये ‘लंबी रेस का घोडा’ ठरल्याचा अनुभव तिची राईड घेतल्यानंतर आला. या अनुभवाबद्दल...

टोयोटाने कॅमरी हायब्रीड ही कार भारतात प्रथम २०१३मध्ये दाखल केली. त्यानंतर तिच्यात अनेक बदल केले. आता जानेवारी २०२२मध्ये ही कार नव्या रुपात पुन्हा दाखल करण्यात आली. हायब्रीड, म्हणजेच या कारमध्ये सेल्फ चार्जिंग तंत्राद्वारे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर अशा दोघांचा मेळ घातला आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची कार सादर झाली. या कारचे एकच व्हेरिएंट आणि तिची दिल्ली एक्स शोरूम किंमत ४१ लाख ७० हजार ठेवण्यात आली आहे. कॅमरी ही टोयोटाच्या ‘टीएनजीए’, अर्थात टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे.

भन्नाट राइड

कॅमरीमध्ये २४८७ सीसी, २.५ लिटर पेट्रोल-हायब्रीड मोटर इंजिन दिले आहे. सेल्फ चार्जिंग तंत्राद्वारे ही कार ५,७०० आरपीएमला २१५ बीएच पॉवर तर ३६००-५२०० आरपीएमला २२० एनएम टॉर्क निर्माण करते. तसेच, ६ स्पीड कन्ट्युनिअसली व्हेरिएबल ट्रान्समिशनसह (सीव्हीटी) या कारमध्ये स्पोर्ट्स, ईको, नॉर्मल असे तीन ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत. त्यामुळे ही कार चालवण्याचा अनुभव भन्नाटच होता. ताकद, रस्त्यावरील पकड, ब्रेकिंग, सस्पेन्शन, वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी प्रवास, तिच्यातील अतिरिक्त वैशिष्ट्ये आदी कुठल्याच बाबतीत तक्रार करण्यासारखे वा खटकणारे नाही. विशेषत: महामार्गावर किंवा निर्जन रस्त्यांवर तिच्या राईडची खरीखुरी मजा घेता येते. कॅमरीच्या इंधन टाकीची क्षमता तशी ५० लिटरची. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) चाचणीनुसार ही कार १९.६१ किलोमीटर प्रतिलिटर इतकी धावू शकते. हायब्रीड तंत्राचा खराखुरा वापर करून मायलेज काढायचे असल्यास प्रत्यक्षात ही कार अगदी आरामात चालवल्यानंतर २२-२३चा मायलेज देण्याची क्षमता राखते. त्यामुळे ही सर्वार्थाने परवडणारी कार ठरते.

अतिरिक्त वैशिष्ट्ये

कॅमरीच्या विविध वैशिष्ट्यांसह एकाच व्हेरिएंटमध्ये येते. त्यात थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, सन रूफ, ऑडिओ सिस्टिमसह जेबीएलचे ९ स्पीकर, एका बटणावर मागे-पुढे होणारे सर्व सीट्स, पाठीमागील प्रवाशांसाठी सनशेड्स, व्हेंटिलेटेड सीट्स, चालकाच्या आसनव्यवस्थेसाठी मेमरी सुविधा, वायरलेस चार्जिंग, रिव्हर्स कॅमेरा, ९ एअर बॅग आदी वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आले आहेत.

हायब्रिड तंत्र कसे कार्य करते?

  • सर्वसाधारण आयसीई किंवा सीएनजी कार सुरू करण्यासाठी पेट्रोलचा वापर होतो. परंतु कॅमरी हायब्रीड बॅटरीद्वारेच सुरू होते आणि पुढील प्रवास सुरू होतो. इलेक्ट्रिक मोटरद्वारेच कारला वेग येतो. इंधनावर चालणारे इंजिन अशा वेळी साह्यकाची भूमिका बजावते.

  • चढावर किंवा ओव्हरटेक करताना पूर्ण एक्सलरेशन देण्याची गरज पडते, तेव्हा कारच्या बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा कारला मोटर/जनरेटरद्वारे अतिरिक्त ताकद पुरवते. यात गरजेनुसार पेट्रोलचा वापर होतो. तसेच इंजिन किंवा मोटरमधून जास्तीत जास्त ताकद मिळते.

  • पारंपरिक कारमध्ये ब्रेक दाबल्यानंतर निर्माण होणारी ऊर्जा साठवण्याची सुविधा नसल्याने ती वाया जाते. परंतु कॅमरी हायब्रीडमधील सेल्फ चार्जिंग तंत्रामुळे एक्सलरेशन सोडल्यावर किंवा ब्रेक दाबल्यानंतर निर्माण होणारी ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT