Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

eknath shinde
eknath shinde sakal

Dombivali News: कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का देण्याचे तंत्र शिंदे गटाकडून सातत्याने सुरू आहे. डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यानंतर आता कल्याण ग्रामीणमधील माजी उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी शनिवारी शिंदे गटात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी हा प्रवेश झाला. आठवडाभरात ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला असून आणखी झटका देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. (Loksabha 2024)

eknath shinde
Eknath Shinde: वाद मिटला, म्हस्केंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नाईक पित-पुत्र

शिवसेना ठाकरे गटातील ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे ग्रामीण भागात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

eknath shinde
Eknath Shinde: वाद मिटला, म्हस्केंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नाईक पित-पुत्र

शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रकाश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यानंतर काही कालावधीतच कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख पद म्हात्रे यांना कोणतेही पूर्व सूचना न देता चर्चा न करता मातोश्रीवरून करण्यात आले होते यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी होती.

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र असून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम हे म्हात्रे यांच्या कार्यकाळात राबविले गेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकट वर्तीय म्हणून म्हात्रे यांच्याकडे पाहीले जात होते. शिवसेनेतील दुफळी आणि म्हात्रे यांचा ठाकरे गटास समर्थन यामुळे त्यांच्यावर दबाव येत होता. अखेर श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

eknath shinde
CM Eknath Shinde : पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शनिवारी शिंदे गटात प्रवेश केलेल्या ठाकरे गटातील शिव सैनिकांना ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

eknath shinde
Loksabha Election 2024 : मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज; जनजागृती करण्यावर दिला भर

यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

eknath shinde
Loksabha Election : लग्नसोहळ्यांतही रंगतोय प्रचाराचा फड ; साहेब आले म्हणून नागरिक अन् मतदार भेटले म्हणून उमेदवार खुश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com