Legender Car Sakal
लाइफस्टाइल

झूम : लिजेंडर : रुबाब कायम

टोयोटा ‘फॉर्च्युनर’ने मागील १३ वर्षांपासून भारतीय बाजारात आपली मजबूत पकड बनवली आहे. दरम्यानच्या काळात फॉर्च्युनरच्या डिझाइनमध्ये थोडेफार बदलही झाले.

प्रणीत पवार

टोयोटा ‘फॉर्च्युनर’ने मागील १३ वर्षांपासून भारतीय बाजारात आपली मजबूत पकड बनवली आहे. दरम्यानच्या काळात फॉर्च्युनरच्या डिझाइनमध्ये थोडेफार बदलही झाले.

टोयोटा ‘फॉर्च्युनर’ने मागील १३ वर्षांपासून भारतीय बाजारात आपली मजबूत पकड बनवली आहे. दरम्यानच्या काळात फॉर्च्युनरच्या डिझाइनमध्ये थोडेफार बदलही झाले. २०१६मध्ये सेकंड जनरेशन फॉर्च्युनर नव्या बदलांसह बाजारात अवतरली, तिलाही ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी टोयोटाने पुन्हा फॉर्च्युनरचे ‘लिजेंडर’ हे टॉप व्हेरिएंट लाँच केले. नियमित फॉर्च्युनरपेक्षा अधिक पॉवरफूल आणि दिसायलाही तितकीच आक्रमक वाटणारी लिजेंडर चालवण्याचा अनुभवही तितकाच भन्नाट, आनंददायी होता. रस्त्यावर धावताना सर्वांचीच नजर खेचणाऱ्या लिजेंडरबद्दल....

फॉर्च्युनर लिजेंडर नियमित फॉर्च्युनरपेक्षा अद्ययावत फीचर्ससह बाजारात आणण्यात आली आहे, त्यात पॉवरचा बूस्टर आणि टर्बो चार्जही अद्ययावत मिळाला आहे. लिजेंडरची एक्सशोरूम किंमत ४२.८२ लाख आहे. ती केवळ २.८ डिझेल, २०१ बीएच पॉवर इंजिनमध्येच उपलब्ध असून, ६ स्पीड, २७५५ सीसी इंजिन क्षमता असलेली लिजेंडर २०१ बीएच पॉवर, ५०० एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनचे हे स्पेसिफिकेशन केवळ दिसण्यातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरही अनुभवता येतात.

फॉर्च्युनरची रस्त्यावरची कामगिरी नेहमीच उजवी राहिली आहे. त्यात लिजेंडरही अपवाद नाही. स्टार्ट करताना होणारा आवाज टिपिकल टोयोटा इंजिनची अनुभूती देतो. त्यातही ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर समोर दिसणाऱ्या बोनेटच्या कडा आणि गाडीची उंची एखादी पिकअप ट्रक चालवत असल्याचा फील देते. लिजेंडरचे इंजिन पॉवरफूल असल्याने हार्ड एक्सिलरेटर दिल्यानंतर. म्हणजे २०००-३००० आरपीएम इंजिन आवाज करते; परंतु गाडी चालवताना मिळणाऱ्या आनंदासमोर तेही चालून जाते.

लिजेंडरमध्ये ईको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. ईको आणि नॉर्मल मोडमध्ये चालवताना काही खास बदल जाणवत नाहीत. एक्सिलरेटर अधिक दिल्यानंतर गाडी चांगला पिकअप घेते. ० ते १००चा वेग ११.२३ सेकंदात घेते. महामार्गावर स्पोर्ट्स मोडचा खरा आनंद घेता येतो. ७ स्पीड सिक्वेंशियल गिअर शिफ्टिंग दिल्याने गिअर बदलाचे कोणतेही धक्के जाणवत नाहीत. गाडीच्या वजनानुसार (२ टन) स्टिअरिंग आपसूकच हार्ड वाटते. याचा महामार्गापेक्षा शहरी किंवा वळणदार रस्त्यावर थोडा त्रास नक्की जाणवतो. गाडीचे ब्रेकही तितकेच नियंत्रित आहेत. १०० च्या वेगातून शून्यावर सुमारे ७ सेकंदात थांबते.

बदल आणि उणिवा...

  • नियमित फॉर्च्युनरपेक्षा लिजेंडरचा समोरील भाग, विशेषत: ग्रीलची रचना, अॅलॉय व्हिलची डिझाईन बदलण्यात आली आहे. लिजेंडरची लांबी, रुंदी, उंची, ग्राऊंड क्लिअरन्स, १८ इंच व्हील नियमित फॉर्च्युनरप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. लिजेंडरमध्ये केवळ पांढरा रंग (मॅट ब्लॅक ड्युअल टोन), डिझेल इंजिन, ४X२ व्हील ड्राईव्ह आणि ऑटोमॅटिक गिअर ट्रान्स्मिशनचा पर्याय दिला आहे.

  • सुरक्षेच्या दृष्टीने लिजेंडरमध्ये ७ एअर बॅग, एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, ईएसपी, रिअर व्ह्यू कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आदी सुविधा दिल्या आहेत. लिजेंडरमध्ये पॅनॉरोमिक सनरूफची उणीव नक्कीच जाणवते. शिवाय किमतीच्या तुलनेत ३६० डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, नेव्हिगेशन ऑन स्क्रीन मिसिंग वाटते. साऊंड क्वालिटीही खास वाटत नाही. लिजेंडर शहरी रस्त्यांवर ८, तर महामार्गावर ९-१० किलोमीटर प्रतिलिटरपर्यंत मायलेज देते.

  • लिजेंडरचा डॅशबोर्ड, इन्स्ट्रूमेंट क्लस्टरची स्टाइलही थोडी बदलण्यात आली आहे. शिवाय कार सुरू करताना चाकांची दिशा कोणत्या बाजूला आहे, हे इन्स्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये दिसून येते. लिजेंडरमध्ये पहिल्यांदाच ‘ॲपल कार प्ले’चा पर्याय देण्यात आला आहे, जो रेग्युलर फॉर्च्युनरमध्येही नाही.

व्हेंटिलेटेड सीट

लिजेंडरमध्ये पहिल्यांदाच व्हेंटिलेटेड सिटची सुविधा देण्यात आली आहे. लाल आणि काळा अशा दुहेरी रंगात हे सिट आहेत. दुसऱ्या रांगेतील सीटवर तीन माणसे आरामात बसू शकतात, शेवटची रांग लहान मुलांसाठीच योग्य.

फॉर्च्युनर लिजेंडर

  • इंजिन : १ जीडी-एफटीव्ही टर्बो चार्ज्ड

  • पॉवर : २७५५ सीसी, २०१ बीएचपी, ५०० एनएम टॉर्क

  • ट्रान्समिशन : ६ स्पीड गिअर बॉक्स विथ टॉर्क कन्व्हर्टर

  • बूट स्पेस : २९६ लिटर

  • किंमत (ऑन रोड) : ५० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT