Sonet car
Sonet car Sakal
लाइफस्टाइल

झूम : सोनेट : स्मूथ अन् फ्रेश

प्रणीत पवार

दक्षिण कोरिया देशातील कार उत्पादक कंपनी किआने भारतीयांची पसंती लक्षात घेत उपलब्ध कारमध्ये विविध बदल करून त्या बाजारात आणल्या आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील ‘सोनेट’देखील त्यापैकीच एक. सोनेटच्या डी १.५, आयएमटी-जीटीएक्स या श्रेणीतील कारच्या राईडची संधी मिळाली. साधारण ४७० किलोमीटर ड्राईव्ह केली. त्यात कारबद्दल बहुतांश चांगले आणि किंचित असमाधानकारक अनुभव आले.

सोनेटचे एकूण २३ व्हेरिएंट्स येतात. त्यातील ‘एचटीई’ हे बेस; तर ‘एक्स-लाईन डिझेल एटी’ हे टॉप व्हेरिएंट असून, या दोघांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ७.७९ आणि १४.६९ लाख रुपये इतकी आहे; तर सोनेटच्या डी १.५, आएमटी-जीटीएक्सची एक्स शोरूम किंमत १३.८९ लाख इतकी आहे.

यामध्ये १४९३ सीसी, ४ सिलिंडर, १.५ लिटर सीआरडी-आय व्हीजेटी डिझेल इंजिन असून, ते ४००० आरपीएमला ११६ पीएस पॉवर आणि १५०० ते २७५० आरपीएमला २५० एनएम टॉर्क निर्माण करते.

अशी होती राईड...

१) ‘सोनेट’ची सलग दोन तास नवी मुंबई ते अलिबाग अशी साधारण ८० किलोमीटरची चार सहप्रवाशांसह राईड केली. मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे असल्याने या रस्त्यावर सोनेटच्या सर्व प्रकारच्या क्षमता तपासता आल्या. विशेषत: आयएमटी गिअरबॉक्स अशा रस्त्यांवर किती किफायतशीर आहे हे पाहता आहे.

२) सलग दोन तास वारंवार क्लच दाबून, गिअर बदलून ड्राईव्ह करणे कंटाळवाणे असते; परंतु सोनेटच्या ड्राईव्हदरम्यान हा अनुभव आला नाही. गिअर कमी करायचा असेल, तर कारमध्ये ‘बीप’ वाजतो. किरकोळ खड्ड्यांच्या वेळी तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरवर अन्य कारमध्ये गिअर कमी करण्याची वेळ येत नाही. सोनेटमध्ये मात्र गिअर कमी करावे लागतात.

३) वरील बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सोनेटला इंजिनमधून मिळणारी ताकद, अतिवेगात रस्त्यावर टिकून राहण्याची क्षमता, दमदार ब्रेकिंगमुळे तात्काळ नियंत्रित होणे आदी जमेच्या बाजू आहेत. स्टेअरिंगच्या हाताळणीचे विशेष कौतुक करावे लागेल. कमी वेगात हलकी तर कमाल वेगात हळूहळू हाताळणी जड होणे, हे रस्त्यावर टिकून राहण्याच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे.

४) वातानुकूलन यंत्रणाही प्रभावी असून पुढे चालक आणि सहप्रवाशासाठी व्हेंटिलेटेड सीट दिले आहेत, जोडीला बोसची प्रीमियम साऊंट सिस्टिम आणि इलेक्ट्रिक सनरूफ लांबचा प्रवास अविस्मरणीय बनवतो. पाठीमागील प्रवाशांची आसनव्यवस्था आरामदायी आहे; परंतु तीनऐवजी दोन प्रौढ व्यक्ती आरामात बसू शकतात.

५) सोनेटच्या राईडमधून सरासरी १५ चे मायलेज मिळाले. त्यात महामार्गावर १७ ते १८ तर शहरी वा खड्डेयुक्त रस्त्यांवर १२ ते १३ चे मायलेज मिळाले.

आयएमटी म्हणजे काय?

सोनेटमध्ये नव्याने आयएमटी हा ६-स्पीड गिअर बॉक्स दिला आहे. ‘आयएमटी’ म्हणजे ‘इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन’ जे क्लच पेडल न वापरता कार्य करते. यात नियमित मॅन्युअल गिअरबॉक्सप्रमाणे गिअर्स बदलू शकतो. पहिल्यांदाच अशा प्रकारचे ट्रान्समिशन असलेल्या कारची राईड केली; परंतु अनुभव चांगला आणि वेगळा होता. ज्यांना क्लचही नको आणि गिअरही बदलायचे आहेत, अशांसाठी ‘आयएमटी’चा पर्याय आहे.

फीचर्स आणि सुरक्षा

‘बोस’ कंपनीचे ७ स्पीकर प्रीमियम सिस्टिम, नेव्हिगेशनसह १०.२५ इंची एचडी टचस्क्रिन, इलेक्ट्रिक सनरूफ, ४.२ इंचीचे अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, किआ कनेक्टेड कार ॲप, चालकासह पुढील सहप्रवाशासाठी व्हेंटिलेटेड सिट्स, स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर आदी अनेक फीचर्स सोनेटमध्ये देण्यात आले आहेत; तर सुरक्षात्मक फीचर्समध्ये ईबीडीसह एबीएस, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, ऑटो हेडलँप आदी अनेक फीचर्सचा व्हेरिएंटनुसार समावेश होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT