tata nexon electric vehicle sakal
लाइफस्टाइल

झूम : नेक्सॉन ईव्हीचा आकर्षक मेकओव्हर

ग्राहकांना दरवेळी नवीन आणि आधुनिक देण्याची परंपरा राखणाऱ्या ‘टाटा’ने आता नेक्सॉनचा संपूर्ण मेकओव्हर करून ती बाजारात आणली आहे.

प्रणीत पवार

टाटा मोटर्सने ‘नेक्सॉन ईव्ही’ पुन्हा नव्या रूपात बाजारात दाखल केली. ‘ऑटो एक्स्पो २०२३’ मध्ये टाटाने सादर केलेल्या ‘कर्व्ह’ या ‘कन्सेप्ट कार’ची पहिली झलक नवीन नेक्सॉन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये इतकी ही कार आधुनिक आहे.

ग्राहकांना दरवेळी नवीन आणि आधुनिक देण्याची परंपरा राखणाऱ्या ‘टाटा’ने आता नेक्सॉनचा संपूर्ण मेकओव्हर करून ती बाजारात आणली आहे. पहिल्यापेक्षा शार्प लूक नेक्सॉनला अधिक आक्रमक बनवतो. नवीन बम्पर, दोन्ही डीआरएल्सला जोडणारा लाईट बार, पाठीमागेही टेललाईट जोडणारा लाईट बार, कार चालू-बंद करताना दोन्ही लाईट बारवर सुरू होणारे वेलकम-गुडबाय ॲनिमेशन हे भविष्यातील कन्सेप्ट कारची झलक दाखवतात.

नेक्सॉन ईव्हीच्या इंटिरिअरमध्ये पूर्वीच्या तुलनेत बरेच बदल केले आहेत. यामध्ये डॅशबोर्ड, दरवाजांवरील रंगांची ‘बेज’ थीम विशेष लक्ष वेधते. ड्राईव्ह मोड निवडण्यासाठी ‘रोटरी डायल’च्या जागी आकर्षक गिअर शिफ्टर दिला आहे.

शिवाय व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग सिस्टिम (ईसपीएस), कॅपेसिटिव्ह क्लायमेट कंट्रोल, यूएसबी सी-पोर्टही देण्यात आला आहे. व्हॉईस कमांडवर आपण बरीच फीचर्स चालू-बंद करू शकतो. त्यात मराठी, हिंदी, तामिळ, कन्नड, इंग्रजी यासारख्या भाषांचे पर्याय येतात.

साधारण १३० किलोमीटरची राईड केल्यानंतर नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्टची हाताळणी पहिल्यापेक्षा सुधारली आहे. स्मूथ सस्पेन्शमुळे बॉडी रोल कमी होऊन कार अधिक वेगातही स्थिर राहते. इलेक्ट्रिक मोटरद्वारे कार तात्काळ वेग पकडते आणि उत्तम ब्रेकिंगमुळे तातडीने नियंत्रितही होते. स्टेअरिंगची हाताळणीही सुलभ झाली आहे. एकूणच राईडिंगला ही कार नाराज करत नाही. हवी त्या वेगात हवी तशी अगदी विश्वासाने ही कार आपण पळवू शकतो.

व्हेरिएंट्स आणि किंमत

नेक्सॉन ईव्हीमध्ये बॅटरी पॅकनुसार एलआर (लाँग रेंज) आणि एमआर (मीडियम रेंज) असे दोन व्हेरिएंट येतात.

त्यातही क्रिएटीव्ह, फिअरलेस, एम्पॉवर्ड असे पर्सोनाज येतात. नेक्सॉन ईव्हीची एक्स-शोरूम किंमत १४.७४ ते १९.९४ लाख इतकी आहे.

व्हेरिएंट - एलआर - एमआर

बॅटरी साईज - ४०.५ केव्ही - ३० केव्ही

रेंज - ४६५ किमी - ३२५ किमी

टॉर्क - २१५ एनएम - २१५ एनएम

पॉवर - १०६.४ केव्ही - ९५ केव्ही

नेक्सॉन म्हणजे भरगच्च पॅकेज

नवीन नेक्सॉन ईव्हीमध्ये वायरलेस चार्जर, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्ले, एअर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, ३६० डिग्री सराऊंड व्ह्यू सिस्टिम, ब्लाईंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, आपत्कालीन स्थितीत ‘एसओएस’ कॉल, मल्टिमोड रिजेन पेडल शिफ्टर्स, इलेक्ट्रिक सनरूफ आदी फीचर्स येतात. सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल ॲसेंट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, हँड ब्रेकऐवजी ऑटो होल्ड, चारही चाकांना डिस्क ब्रेक, पुढील पार्किंग सेन्सर्स देण्यात आले आहेत.

इतर खास फीचर्स

  • व्ही टू व्ही चार्जिंग : याद्वारे दुसरे वाहन कुठेही, कधीही चार्ज करू शकतो, जिचे पॉवर आऊटपुट ५ केव्हीपर्यंत आहे.

  • व्ही टू एल टेक : बॅटरी असलेली सर्व उपकरणे चार्ज करू शकतो.

  • जेबीएल सिनेमॅटिक सिस्टिम : ८ स्पीकर्स, एक सबवूफरसह मल्टिपल ऑडिओ मोड्सद्वारे हवा तशा आवाजात म्युझिक सिस्टिम वाजवू शकतो.

  • डिजिटल कॉकपिट : मल्टिडायल व्ह्यू असलेल्या डिजिटल कॉकपिटमध्ये एनर्जी फ्लो, चार्जिंग, नेव्हिगेशन आदी बाबी ठळकपणे दिसतात.

  • इन्फोटेन्मेंट सिस्टिम : नेक्सॉन ईव्हीमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील सर्वांत मोठा (१२.३ इंची) आणि उच्च दर्जाचा इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.

  • आर्केड.ईव्ही (Arked.ev) : आपण मोबाईल वायफायच्या माध्यमातून विविध ॲप इन्स्टॉल करून युट्यूब किंवा थेट पॉडकास्टच्या माध्यमातून व्हिडीओ, सिनेमा पाहू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT