Car Sakal
लाइफस्टाइल

झूम : कारखरेदीला ‘वेटिंग ’चे ग्रहण

स्वत:ची छोटी का होईना, पण चांगली आणि सर्व सुविधांनी युक्त अशी कार असावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

प्रणीत पवार

स्वत:ची छोटी का होईना, पण चांगली आणि सर्व सुविधांनी युक्त अशी कार असावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

स्वत:ची छोटी का होईना, पण चांगली आणि सर्व सुविधांनी युक्त अशी कार असावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो. पैशाची तजवीजही होते आणि कार खरेदीचा उत्साह अधिक वाढतो. परंतु आवडत्या कारबाबत शोरूममध्ये चौकशी करायला गेल्यानंतर हा उत्साह मावळतो. त्याला कारण म्हणजे ‘वेटिंग पिरियड’चा अडथळा. हल्ली सर्वांनाच या वेटिंग पिरियडचा सामना करावा लागत आहे. विविध कारणे आहेत त्यासाठी. पूर्वी काही कार कंपन्या आपली ‘ब्रँड व्हॅल्यू’ टिकवून ठेवण्यासाठी जाणूनबुजून वेटिंग पिरियड वाढवत होते, पण हल्ली तशी परिस्थिती नाही. ही जागतिक समस्या दोन वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे ग्राहकांचा कारखरेदीतील उत्साह मावळत आहे.

इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल वाहनांमध्ये विविध आधुनिक फीचर्ससाठी सिलिकॉन, सेमिकंडक्टर चिप्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, जगभरातील वाहन उद्योगाला गेल्या काही वर्षांपासून या चिप्सच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याने वाहन निर्मात्या कंपन्यांना वेटिंग पिरियड वाढवावा लागत आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास कार कंपन्यांनी अतिरिक्त फीचर्समध्ये कपात करून किंवा बेस मॉडेलच बाजारात आणून विक्रीचा पर्याय खुला ठेवला आहे.

चिप्सचा तुटवडा संपणार?

इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडियाच्या (आयसीआरए) सर्वेक्षणातून चिप्सच्या तुटवड्याची समस्या लवकरच संपणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रवासी वाहनांत वापरल्या जाणाऱ्या सेमिकंडक्टर चिपमध्ये कॉम्प्युटर, मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या तुलनेच कमीत कमी तपशील, वैशिष्ट्यांचा समावेश असतो. कोरोना साथकाळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे या कॉम्प्युटर तसेच मोबाईलला मागणी वाढली; परिणामी यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सलाही मागणी वाढली होती. परंतु याच काळात वाहन निर्मात्या कंपन्यांनी जगभरातील उत्पादन थांबवल्याने सेमिकंडक्टर चिप निर्मात्या कंपन्यांनी मागणीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रगत चिप्सच्या निर्मितीला प्राधान्य दिले. कोरोना साथ उतरणीला आल्यानंतर वाहन निर्मात्या कंपन्यांनी उत्पादन प्रक्रिया पुन्हा वेगात सुरू केली तेव्हा आधुनिक सेमिकंडक्टर चिप्स, सिलिकॉन चिप्स निर्मात्यांनी कमीत कमी तपशील, वैशिष्ट्ये असलेल्या चिप्सच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चिप्सच्या निर्मितीत सुधारणा होत असल्याने कारसाठी वेटिंग पिरियडचा अडथळा कमी होण्याचे सकारात्मक चित्र आहे. कारच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या ४० टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी याबाबत अभिप्राय देताना सांगितले, की ही परिस्थिती गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत नक्कीच सुधारणार आहे.

वर्षभराहून अधिक वेटिंग पिरियड

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्यानी आपल्या उत्पादनांमध्ये कमी किमतीत अधिक फीचर्स देण्यासाठी केलेले प्रयत्न या वाहन उद्योगाच्या वाटचालीस मारक ठरले. सिलिकॉन चिप्सच्या कमतरतेमुळे आता कारमधील विविध फीचर्सना कात्री लावावी लागत आहे. महिंद्रा एक्सयूव्ही ७०० आणि महिंद्रा थार यासारख्या भारतातील लोकप्रिय प्रवासी वाहनांचा संपूर्ण देशात सरासरी वेटिंग पिरियड हा वर्षभराहून अधिक आहे, तर टोयोटा लँड क्रूझरसारख्या आतंरराष्ट्रीय वाहन कंपनीच्या कार्सना तब्बल चार वर्षांचा वेटिंग पिरिएड आहे.

याचा विचार होऊ शकतो...

एखादे नवीन वाहन रस्त्यावर येण्यापूर्वी त्याची जोडणी होण्यास किंवा त्याच्या निर्मितीस बराच वेळ लागतो. सध्या चिप्सच्या तुटवडा असला तरी या परिस्थितीवर मात करून, नजीकच्या भविष्यात वाहनांचा वेटिंग पिरियड कमी होईल, ग्राहकांना कमी वेळेत त्यांच्या आवडत्या वाहनाची खरेदी करणे शक्य होईल. वेटिंग पिरियड कमी केल्याने डिलर्सला त्यांच्याकडील वाहनांची यादी अद्ययावत ठेवणे शक्य होईल; याचा फायदा असा, की ग्राहकांना डिलरशीप पातळीवर कारखरेदीत आर्थिक सूट देणेही शक्य होईल. कार खरेदीचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कार कंपन्या नक्कीच यावर विचार करू शकतात.

निवडक कारचे वेटिंग (महिन्यांत)

  • महिंद्रा एक्सयूव्ही ७०० - २०

  • महिंद्रा थार - ११

  • एमजी एस्टर - ६

  • किआ सोनेट - ६

  • ह्युंदाई क्रेटा - ६

  • टाटा नेक्सॉन - ४

  • टाटा पंच - ४

  • टोयोटा फॉर्च्युनर- ४

  • किआ सेल्टॉस - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT