YAMAHA Bike Sakal
लाइफस्टाइल

झूम : यामाहा : बदलत्या ट्रेंडचा स्वीकार

यामाहा म्हटले, की डोळ्यांसमोर येते ‘टिपिकल’ आवाजाची ‘आरएक्स १००/१३५’ ही गाजलेली दुचाकी. अजूनही लाखो चाहते आहेत.

प्रणीत पवार

यामाहा म्हटले, की डोळ्यांसमोर येते ‘टिपिकल’ आवाजाची ‘आरएक्स १००/१३५’ ही गाजलेली दुचाकी. अजूनही लाखो चाहते आहेत. कालांतराने स्पोर्ट्‌स प्रीमियम बाईक श्रेणीत यामाहाने तरुणाईला साजेशा अनेक दुचाकी बाजारात आणल्या. मजबूत आखणी, रायडिंगचा सर्वोत्तम आनंद देणाऱ्या दुचाकींमुळे यामाहाने भारतात आपला ग्राहक वर्ग राखला आहे.

स्पर्धात्मक बाजारपेठेत आपले अस्तित्व बळकट करण्यासाठी ‘यामाहा’ने पाच वर्षांपूर्वी ‘दी कॉल ऑफ ब्ल्यू’ ही ब्रँड मोहीम आणि नुकतीच ‘मॉन्स्टर एनर्जी मोटो जीपी एडिशन’ ही दुचाकीची नवीन श्रेणी सादर केली. या मोहिमेने बाजारपेठेत कंपनीची एक स्वतंत्र जागा बनविण्यात लक्षणीय भूमिका बजावली आहे. या मोहिमेद्वारे यामाहाने क्रीडा श्रेणीत (प्रीमियम आणि डिलक्स श्रेणींसह) १७ टक्के; तर स्कूटर श्रेणीत १४ टक्के हिस्सा मिळवला असल्याचे यामाहा मोटर इंडियाच्या विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींदरसिंग यांनी सांगितले.

दुचाकी खरेदी करताना तिची किंमत महत्त्वाचा मुद्दा असतो; परंतु सर्वसामान्य, बजेटचा विचार करणारी व्यक्तीही हल्ली यामाहाकडे वळत आहे. सामान्यांच्या आवाक्याप्रमाणेच यामाहाने मुख्य भर प्रीमियम मार्केटवर दिला आहे, ज्याला ग्राहकांची मागणी असते. ब्ल्यू स्क्वेअर आऊटलेट्स यामाहाच्या भारतातील विस्ताराच्या धोरणामध्ये महत्त्‍वाची भूमिका बजावत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

आमच्या प्रतिष्ठित ग्राहकांना एक विशेष आणि खास त्यांच्या गरजेनुसार खरेदीचा अनुभव मिळवून देणे हा मध्यवर्ती हेतू असल्याचे ते म्हणाले. सध्या यामाहाचे देशभरात २२० हून अधिक ब्ल्यू स्क्वेअर आऊटलेट्स आहेत. हा आकडा आगामी काळात तीनशेपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

मोटो जीपी आणि यामाहा

१) ‘ग्रँड प्रिक्स मोटरसायकल रँकिंग’ ही मोटरसायकल रोड रेसिंगची मुख्य स्पर्धा आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मोटो जीपीच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. यातून जगभरातील रेसर्सना रँकिंग मिळते. यामाहाने मोटोजीपी चॅम्पियनशीप या क्रीडाक्षेत्रातील एक बहुचर्चित वारसा चालविणारी कंपनी म्हणून या स्पर्धेवर आपला ठळक ठसा उमटवला आहे.

२) यामाहाच्या मोटो जीपी टीमने गेल्या ६० वर्षांत ५०० हून अधिक ‘ग्रां प्री’ विजयांची नोंद केली आहे. मोटो जीपीच्या इतिहासातील काही सर्वाधिक यशस्वी टीम्समध्ये यामाहाचे नाव घेतले जाते. मोटो जीपी भारत २०२३चा थरार नुकताच नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर (बीआयसी) अनुभवायला मिळाला. यावेळी यामाहाच्या आर-३ आणि एमटी-०३ या आगामी बाईक्सची झलक पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT