Pre Monsoon Health Care:  Sakal
लाइफस्टाइल

Health Care: सध्या वळवाचा पाऊस पडत असल्याने घ्या आरोग्याची काळजी

Pre Monsoon Health Care: रस्त्यावर जागोजागी तुंबलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. परिणामी, यामुळे मलेरिया डेंगीचा प्रादुर्भाव होतो.

सकाळ वृत्तसेवा

Pre Monsoon Health Care: उन्हाळ्याच्या अखेरीस मे महिन्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सनपूर्व पाऊस होत आहे. त्यातच मॉन्सूनने अंदमानात हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून राज्यात येऊ शकतो. या पाश्वर्श्वभूमीवर पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

पावसाळ्यात पाण्याशी संबंधित व्याधी उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोके वर काढण्याची शक्यता असते. टायफॉइड, डायरिया, काविळीची साथ पसरत असते. रस्त्यावर जागोजागी तुंबलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. परिणामी, यामुळे मलेरिया डेंगीचा प्रादुर्भाव होतो.

पावळ्यात इन्फेक्शन, कफ, सर्दी होण्याची शक्यता असते. या काळात हलके जेवणासह तिखट, कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा टाळल्यास शरीरात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. परंतु, आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार दूर करता येतो.

उद्भवणारे आजार

पावसाच्या दिवसांत पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फूड, उपवासासाठी शेंगदाणे, भगर हे पदार्थ खाणे टाळावे. पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे. यामध्ये बेसन लाडू, टोमॅटो सूप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबू, चिंच, सुखे खोबरे या पदार्थांचा वापर करावा.

शिवाय तांदूळ, गहू, यापासून विविध पदार्थ बनवून याचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. डास चावल्यामुळे हिवताप, मलेरिया होतो, एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते. सर्दी, खोकला अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यामुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात. ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो. तसेच पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण जास्त होते.

अन्नपचन मंदावते

पावसाळ्यातील थंड वातावरण व पावसात साचलेल्या पाण्यातून अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. त्यातच वातावरणामुळे जाठराग्नी मंद झालेला असतो म्हणजेच अन्नपचन मंदावलेले असते. पोट बिघडून उलट्या होणे, जुलाब लागणे व भूक न लागणे अशा पोटाच्या तक्रारी चालू होतात.

त्यामुळे घरी शिजवलेले, ताजे, हलके व स्वच्छ अन् खावे, बाहेरचे, उघड्यावरील चमचमीत पदार्थ टाळावेत. संध्याकाळी दरवाजे व खिडक्या लवकर बंद करून घेणे व डास आपल्याला चावणार नाहीत याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वर्षा ऋतू मध्ये वात प्रकोप होत असतो. त्यामुळे सांधेदुखी चे आजार वाढण्याची शक्यता असते.

अशी घ्यावी काळजी

रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.

पावसाळ्यात पाणी उकळून घ्यावे.

पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.

पावसाळ्यामध्ये आयुर्वेदिक अरविंदासच, महासुदर्शन काढा वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधे यावीत.

पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT