लाइफस्टाइल

पिरीअड मिस झाल्यावरही प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह येतीये?

मासिक पाळी चुकल्यावर स्त्रियांच्या मनात पहिला संशय येतो तो म्हणजे आपण प्रेग्नंट तर नाही ना?

शर्वरी जोशी

बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारपद्धतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर health होत असतो. त्यामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवतात. यामध्येच अनेक विवाहित स्त्रियांच्या मासिक पाळीची तारीखही चुकते. परंतु, अनेकदा मासिक पाळी period चुकली की स्त्रियांच्या मनात पहिला संशय येतो तो म्हणजे आपण प्रेग्नंट pregnant तर नाही ना? फॅमेली प्लॅनिंग केल्यानंतर स्त्रियांची मासिक पाळी चुकली की अनेक जणी प्रग्नंसी टेस्ट करतात. मात्र, अनेकदा या टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येतात. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया घाबरुन जातात. म्हणूनच, मासिक पाळी चुकल्यावरही प्रेग्नंसी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो ते पाहुयात. (pregnancy-and-parenting-pregnancy-symptoms-reasons-to-have-negative-pregnancy-even-after-missing-period-ssj93)

१. चुकीची जीवनशैली -

सध्याच्या काळात जीवनशैलीसोबतच आपली आहारपद्धतीदेखील बदलली आहे. त्यामुळे सहाजिकच त्याचा विपरित परिणाम आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर होतो. यामध्येच अनेक स्त्रियांना मद्यपान किंवा धुम्रपान करण्याची सवय असते. याच सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. परिणामी, मासिक पाळीच्या तारखा मिस होतात. त्यामुळे मासिक पाळी चुकली तरीदेखील त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्हच येतात.

२. एक्टोपिक प्रेग्नंसी -

ही समस्या फार क्वचितप्रसंगी स्त्रियांमध्ये जाणवते. यात साधारणपणे प्रेग्नंट असल्याची सगळी लक्षणं दिसतात. मात्र, तरीदेखील रिपोर्ट निगेटिव्ह येतात. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. चक्कर येणे, मॉर्निग सिकनेस, ओटीपोटात दुखणे, मासिक पाळीच्या काळात कमी रक्तस्राव होणे, उलटी होणे यांसारखी लक्षणे एक्टोपिक प्रेग्नंसीच्या काळात जाणवतात. त्यामुळे कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. स्तनपान -

प्रेग्नंसीच्या काळात जवळपास ९ महिने मासिक पाळी न आल्यामुळे बाळाच्या जन्मानंतर मासिक पाळीशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. यात बऱ्याचदा ब्रेस्ट फिडिंग करताना सुद्धा मासिक पाळी चुकू शकते. कारण, बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधावाटे शरीरातील पोषक तत्व बाळाला मिळतात. त्यामुळे अनेकदा स्त्रियांना आवश्यक असणारे घटक त्यांना मिळत नाही. परिणामी, मासिक पाळी चुकू शकते.

हे लक्षात ठेवा -

तुमच्या मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवा. तसंच ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

घरी प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतरही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

घरी करण्यात येणारी प्रेग्नंसी टेस्ट १०० टक्के योग्यच असते असं नाही.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT