Late Pregnancy esakal
लाइफस्टाइल

Late Pregnancy : तिशीच्या आत मुलं होऊ द्या, असं का म्हणतात? वय आणि फर्टिलिटी कनेक्शन जाणून घ्या

वाढत्या स्पर्धेत आणि महागाईत आर्थिकदृष्ट्या स्थैर्यताही उशिरा येते आणि पर्यायाने मुलं होऊ देण्याचा निर्णय उशिरा घेतला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Pregnancy Health Tips Age And Fertility Connection : आपले आजी, आई अनेकदा असं बोलताना आपण ऐकलं असेल की, तिशीच्या आत मुल होऊ द्या. नंतर त्रास होतो. पण हल्ली स्त्री, पुरूष सगळेच करिअरच्या मागे असल्याने लवकर मुलं नको असा दृष्टीकोन असतो. शिवाय वाढत्या स्पर्धेत आणि महागाईत आर्थिकदृष्ट्या स्थैर्यताही उशिरा येते आणि पर्यायाने मुलं होऊ देण्याचा निर्णय उशिरा घेतला जातो.

पण मग नंतर याचे बरेच दूष्परिणामही भोगावे लागतात. म्हणून वाढत्या वयाचा आणि मुल होऊ देण्याच कनेक्शन काय आहे, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊ.

Late Pregnancy

तिशी, चाळीशीनंतर गर्भवती राहू शकत नाही असं नाही. पण वाढतं वय आणि ओव्हुलेटरी चक्र तसंच शुक्राणूंची संख्या याचा संबंध असल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते. प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी होते.

फर्टिलिटीची समस्या महिलांमध्ये तसंच पुरूषांमध्येही जाणवू शकते. महिलांच्या वयाचा यावर परिणाम होऊ शकतो. याची समज दोघांना असणं गरजेचं आहे. तरच गर्भधारणा आणि गर्भावस्थेदरम्यान योग्य पर्याय निवडण्यास मदत होऊ शकते.

आपल्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त महिलांना फर्टिलिटी म्हणजेच प्रजननाशी संबंधीत गोष्टींबाबत अधिक माहिती नसते. त्यातही बायोलॉजिकल क्लॉकबाबत अजिबातच माहिती नसते.

Late Pregnancy

पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या वयाचा फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो?

जर वय प्रजननक्षमतेसाठी अंगभूत घटक मानले गेले तर त्याचा परिणाम स्त्रिया आणि पुरुषांवर वेगळा होतो. महिला निश्चित संख्येने स्त्री बीज (अंडी) घेऊन जन्माला येतात, जे वाढत्या वयानुसार कमी होत जातात. विशिष्ट वयोमर्यादेनंतर स्त्री बीज संपायला सुरूवात होते. या अंड्याना पुन्हा तयार केलं जाऊ शकत नाही.

तुलनेनं पुरूषांच्या शरीरात वीर्य सतत तयार होत असते. यावरून दिसून येते की गर्भधारणेसाठी महिलांनी विशिष्ट वयोमर्यादेतच प्रयत्न करायला हवेत. पुरूष आपल्या वयाच्या 60 व्या वर्षीही वडील बनू शकतात. आज आम्ही तुम्हाला फर्टिलिटीचे योग्य वय नेमके कोणते याबाबत सांगणार आहोत.

वयाच्या 20 ते 30 च्या दरम्यान गर्भधारणा

तज्ज्ञांच्या मते हे वय मुल जन्माला घालण्यासाठी उपयुक्त असते. कारण या वयात महिला जास्त फर्टाईल असतात. दुसऱ्या दशकाच्या सुरूवातीला आणि शेवटी फर्टिलिटीमध्ये फारसा फरक जाणवत नाही.

या वयात गर्भधारणा झाल्यास काय फायदे होतात?

  • अनुवंशिक आजारांचा धोका कमी

  • महिलांच्या अंड्यांमध्ये अनुवांशिक असमानता होण्याची शक्यता कमी होते. या वयात कोणताही अनुवंशिक आजार उदा. डाउन सिंड्रोम, थॅलेसीमिया या आजाराची लागण मुलांना होत नाही.

  • गर्भपाताचा धोका फक्त १० टक्के असतो.

  • मुलाच्या जन्माच्यावेळी वजन कमी न राहता व्यवस्थित विकास होतो.

  • याशिवाय आईला गर्भकालिन डायबिटिज, हायपरटेंशन याप्रमाणे अन्य समस्यांचा धोका कमी असतो.

तिसऱ्या दशकात गर्भधारणा

जर एखादी स्त्री तिच्या तिसऱ्या दशकात गर्भवती होऊ इच्छित असेल तर प्रत्येक महिन्यात गर्भवती होण्याची शक्यता 15 ते 20% दरम्यान असते. यासाठी देखील त्यांच्यात कोणतीही मूलभूत स्थिती (आधीपासूनच एक गंभीर आजार) असू नये. एका अभ्यासानुसार, वयाच्या तिसऱ्या दशकात स्त्रिया त्यांच्या पहिल्या प्रयत्नात गर्भवती होण्याची शक्यता 30% अधिक असते.

जेव्हा स्त्री 35 वयात पोहोचते तेव्हा अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाल्यामुळे तिची प्रजनन क्षमता कमी होते. वयाच्या 35 व्या वर्षानंतर, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात कमी होते. या वयात जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता जास्त असते.

40 नंतर गर्भधारणा

40 नंतर गर्भवती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी होते. वयाच्या 45 वर्षानंतर हा दर 1% होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जगातील निम्म्या स्त्रिया आपल्या वयाच्या चौथ्या दशकात प्रजनन समस्यांनी ग्रस्त आहेत. या वयात पुरूषांची प्रजनन क्षमताही हळू हळू कमी होते. कारण शुक्रांणूंच्या संख्येत कमतरता जाणवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT