Pregnancy Sex esakal
लाइफस्टाइल

Pregnancy Sex : गर्भावस्थेत सेक्सचा आनंद घ्यायचाय? या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

जोवर तुम्ही गर्भावस्थेत सहज हालचाली करू शकत असाल तोवर सेक्स अगदी नॉर्मल आहे. फक्त या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sex In Pregnancy : गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होत असतात. यात काहींना सेक्स करण्याची इच्छा होते तर काही अजिबात नको वाटतं. पण गर्भावस्थेत सेक्स करायचा की नाही हे पुर्णपणे त्या दोघ जोडीदारांचा निर्णय असतो. पण जर गर्भावस्थेत सेक्स करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

काय सांगतं संशोधन

गर्भावस्थेत लैंगिक संबंध साधले जाणं ही फार स्वाभाविक गोष्ट आहे. पण पहिल्या तीन महिन्यात याचं प्रमाण अधिक असतं. ९ व्या महिन्यापर्यंत येता येता काही महिलांची इच्छा कमी कमी होत जाते.

Pregnancy Sex

जसे दिवस वाढतात तशी इच्छा कमी होते यामागे, गर्भपाताची भीती, भ्रुणाला नुकास पोहचण्याची भीती, रस कमी होणं, अस्वस्थता असे बरेच कारणं असतात. गर्भावस्थेत येणाऱ्या शारीरिक अडचणी आणि संसर्गाची भीती यामुळे पण इच्छा कमी होते.

Pregnancy Sex

काय घ्यावी काळजी?

योग्य पोझिशन आवश्यक

जस जसे दिवस वाढतात तसे अशी पोझिशन घ्यावी ज्यामुळे गर्भवतीच्या पोटावर दाब येणार नाही.

आरामदायक स्थिती असावी

जर महिला जोडीदाराच्या वर, बाजूला किंवा बेडच्या किनाऱ्यावर असेल तर ही स्थिती तिच्यासाठी आरामदायक ठरू शकते.

ओरल सेक्स

गर्भावस्थेत ओरल सेक्स पुर्णपणे सुरक्षित आहे. पण अशावेळीत महिलेच्या योनीत हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी. एयर एम्बोलिज्म आई आणि बाळासाठी घातक ठरू शकतो.

अ‍ॅनल सेक्स

अ‍ॅनल सेक्समुळे गर्भाला कोणतही नुकसान होत नाही. पण महिलेच्या कंफर्टकडे लक्ष दिले जायला हवे. बऱ्याच महिलांना या काळात कंबरेखाली दुखते किंवा मुळव्याधीचा त्रास होतो. अशात अ‍ॅनल सेक्स त्रासदायक ठरेल.

या परिस्थितीत सेक्स करू नका

  • जर सर्विक्सची समस्या असेल तर सेक्स करू नका. गर्भपाताची शक्यता असते.

  • जर जुळी मुलं असतील तर सेक्स टाळावा.

  • जर प्लॅसेंटा सर्विक्सला कव्हर करत असेल तर टाळावं.

  • सर्विक्स वेळे आधी उघडत असेल तर सेक्स टाळा.

  • वेळे आधी प्रसुती हाण्याची शक्यता असल्यास.

  • योनीतून अत्याधिक रक्तस्राव होत असेल तर

  • वॉटर लिकेजची समस्या असल्यास सेक्स टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT