pregnancy. 
लाइफस्टाइल

प्रेग्नंसी टेस्ट किती प्रकारच्या असतात माहितीये?

'या' प्रेग्नंसी टेस्टविषयी कदाचित तुम्हाला माहिती नसेल

सकाळ डिजिटल टीम

प्रेग्नंसी टेस्ट अनेक प्रकारच्या असतात. यात खासकरुन युरिन आणि ब्लड टेस्ट मुख्य असल्याचं म्हटलं जातं. मासिक पाळीची तारीख चुकल्यावर अनेक स्त्रियांना त्या प्रेग्नंट असल्याचा संशय येतो. मात्र, दरवेळी मासिक पाळी चुकली म्हणजे प्रेग्नंसीच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणूनच, अशा प्रसंगी प्रेग्नंसी टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे दरवेळी युरिन आणि ब्लड टेस्टचा रिपोर्ट योग्यच येईल असं नाही. तर अनेकदा हे रिपोर्ट चुकीचेदेखील येतात. त्यामुळेच या टेस्ट व्यतिरिक्त अन्य कोणत्या टेस्ट केल्या जातात ते पाहुयात. (pregnancy test different types of pregnancy tests and their role in determining pregnancy)

१. युरिन टेस्ट -

प्रेग्नंसी टेस्ट करण्याची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत म्हणजे युरिन टेस्ट. युरिन टेस्ट करण्यासाठी सकाळच्या पहिल्या युरिनचं सॅम्पल घ्यावं लागतं. तसंच घरी प्रेग्नंसी किटच्या माध्यमातूनही ही प्रेग्नंसी टेस्ट करता येऊ शकते. मात्र, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित टेस्ट करणं गरजेचं आहे.

२. ब्लड टेस्ट -

ब्लड टेस्ट केल्यावरही प्रेग्नंसी रिझल्ट मिळतो. यात क्वालिटेटिव्ह एचसीजी टेस्ट आणि क्वांटिटेटिव्ह एचसीजी या दोन टेस्ट केल्या जातात. या टेस्टमुळे प्रेग्नंसी आहे की नाही किंवा त्यात कोणती अडचण आहे का ते दिसून येतं.

अ. क्वालिटेटिव्ह एचसीजी टेस्ट -

क्वालिटेटिव्ह एचसीजीमध्ये प्रेग्नंसी असल्याचं लक्षण दिसून येतात. मासिक पाळीची तारीख चुकल्यानंतर १० दिवसांनी ही टेस्ट केली जाते. यात रक्तात असलेल्या एचसीजीमुळे प्रेग्नंसी असल्याचं क्लिअर होतं.

ब. क्वांटिटेटिव्ह एचसीजी टेस्ट -

ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोफिन (एचसीजी) या हार्मोन्समुळे प्रेग्नंसीमध्ये काही समस्या असेल तर ती दिसून येते. हे हार्मोन्स युटेरस वॉलला संलग्न असतात. ज्यामुळे फर्टिलाइज्ड एग डेव्हलप होत असतात. त्यामुळे क्वांटिटेव्ह एचसीजी टेस्ट केल्यानंतर गर्भधारणेत कोणती अडचण असेल तर ती लगेच दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT