Soap sakal
लाइफस्टाइल

Handmade Soap: घरच्या घरी बनवा नीम साबण, पावसाळ्यात मुरुमांच्या समस्येपासून मिळेल सुटका

कडुलिंब केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर तुमच्या त्वचेसाठीही वरदानापेक्षा कमी नाही.

Aishwarya Musale

अँटिऑक्सिडंट्स, अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध, कडुलिंब केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर तुमच्या त्वचेसाठीही वरदानापेक्षा कमी नाही. पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स, रॅशेस, पुरळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात, कडुनिंब तुम्हाला या समस्यांमध्ये खूप आराम देतो. 

कडूलिंबाच्या पानांना पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे इंफेकशन कमी होण्यास मदत मिळते. पण रोजरोज हे पाणी बनविण्याचे कष्ट कोण घेणार? अशावेळी नीम साबणाने आंघोळ हा उत्तम उपाय आहे.

कडूलिंबापासून बनवलेला नीम साबण विकत आणण्याऐवजी या आयुर्वेदिक साबणला तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. यामुळे तूमच्या त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात. 

बाजारात विकल्या जाणाऱ्या साबणावर विश्वास ठेवणे कठीण असते. त्यामुळे हा साबण तुम्ही स्वतः घरी बनवणे चांगला पर्याय ठरेल. इथे जाणून घेऊया साबण बनविण्याची पध्दती आणि त्याचे फायदे.

साबण बनविण्याचे साहित्य

कडूलिंबाचा पाला, ग्लिसरीन साबण, व्हिटॅमिन ई च्या कॅपसूल, पाणी, साबण बनवण्याचा साचा, जर साचा नसेल तर पेपर कप किंवा लहान वाटी.

कृती

१. प्रथम कडूलिंबाचा पाला स्वच्छ धूवून घेत मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी टाकून फाईन पेस्ट बनवावी.

. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्यावी. ग्लिसरीन साबणाचे बारीक तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात लहान भांडे ठेवून त्यात साबणाचे तुकडे टाकावे.

३. जेव्हा हे तुकडे पुर्ण विरघळतील मग त्यात कडूलिंबाच्या पाल्याची पेस्ट टाकावी. व्हिटॅमिन ई च्या कॅपसूल टाकाव्या व थोड्यावेळ गरम होऊ द्यावे.

४. नंतर हे लिक्वीड साच्यात घालून थंड होऊ द्यावे.

हा साबण नियमितपणे वापरल्याने तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स 1400 अंकांनी वाढला

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT