Heat Wave Sakal
लाइफस्टाइल

Heat Wave: शरीरामधील उष्णतेत होते वाढ; जडतात मूळव्याध, ॲसिडिटीसारखे आजार

Heat Wave: . तापमानवाढीचा परिणाम शरीराच्या उष्णतेवर होत असल्याने, आहारदेखील महत्त्वाचा ठरतो.

सकाळ वृत्तसेवा

Heat Wave: वाढत्या तापमानामुळे शरीराच्या उष्णतेतही वाढ होते. यामुळे पोटात आग होणे, मूळव्याध, ॲसिडिटी यासारखे आजार जडतात. योग्य काळजी आणि आहार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उन्हाळ्यात ‘सन स्ट्रोक’चा धोका अधिक असतो. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यामुळे पाणी कमी होऊन शरीरातील उष्णता वाढते. यासाठी जास्तीत-जास्त द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. गोड, थंड पदार्थांचे सेवन करावे. यासह शरीरातील इलेक्ट्रोराइटचे प्रमाण योग्य ठेवणे महत्त्वाचे ठरते. शरीरातील उष्णता वाढल्यास घरात असतानाही माणसाला धोका संभवतो. यामुळे योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

अशी घ्यावी काळजी

  • भरपूर पाणी पिऊन घराबाहेर पडावे.

  • बाहेर पडताना पांढऱ्या कपड्याने कान झाकावे.

  • लस्सी, ताक, लिंबू पाणी, पन्हे, कोकम शरबत घ्यावे.

  • इलेक्ट्रोराइट बॅलन्स साठी लोणचे,चटणी याचे सेवन वाढवावे.

  • वाळा, चंदन, नागरमोथा थंड पाण्यात भिजवून ते पाणी प्यावे.

  • जिरेपूड टाकून देखील ताकाचे सेवन करू शकतात.

तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावणे उत्तम पर्याय. तापमानवाढीचा परिणाम शरीराच्या उष्णतेवर होत असल्याने, आहारदेखील महत्त्वाचा ठरतो. पोटात आग होणे, मूळव्याध, ॲसिडिटी यासारखे आजार होतात. यासाठी द्रव आहाराचे सेवन वाढवावे. त्यात वेगवेगळे शरबत, पन्हे, ताक, लस्सी यांचा समावेश करू शकता.

- डॉ. मनोज जोशी, आयुर्वेदतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT