Propose Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Propose Day 2023 : नात्यातील प्रेम संपलंय? मग वेळ आलीय पत्नीला पुन्हा प्रपोज करायची!

तूमच्यात तो जिव्हाळा संपला असेल तर पुन्हा एकदा नात्याला रिस्टार्ट करण्याची गरज आहे

सकाळ डिजिटल टीम

नातं म्हटल्यावर किरकोळ भांडण होणार हे ठरलेलंच असतं. कधी त्याकडे दुर्लक्ष करत तर कधी जोडीदाराच्या चुकांकडे कानाडोळा करत संसार केला जातो. नाते दोघांचे असते पण ते टिकवण्यासाठीची धडपड एकाचीच दिसते. यामुळे नात्याची गरज नक्की कोणाला असे प्रश्नही पडू लागतात.

नात्यात कधीतरी होणारी भांडण जेव्हा मोठ्या भांडणात रूपांतरित होतात. तेव्हा नाते नकोसे वाटायला लागते. कुटुंबातील व्यक्ती, पाहुणे यांनाही तूमच्यातले वाद कळतात. तेव्हा त्यांना सामोरे जाणे कठीण होऊन बसते.

नातं लग्नाचं असो वा केवळ प्रेमाचं त्यात आपुलकी जिव्हाळा आणि प्रेम असायलाच हवे. पण, तूमच्यात तो जिव्हाळा संपला असेल तर पुन्हा एकदा नात्याला रिस्टार्ट करण्याची गरज आहे. कसे ते पाहुयात.

सध्या सुरू असलेला व्हॅलेंटाईन विक तूम्हाला तूमचे हरवलेलं प्रेम परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. तूम्हाला आठवतं का तूम्ही तूमच्या पत्नीला शेवटचं आय लव्ह यू कधी म्हणाला होता ते. नाही ना? तूमचेही उत्तर नाही असे असेल तर आज प्रपोज डेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेम उतू घालवा. म्हणजे, एखाद्या छानशा लोकेशनवर पत्नीला फिरायला न्या आणि तिला पुन्हा एकदा प्रपोज करा.

गिफ्ट द्या

पत्नीला शेवटचं गिफ्ट कधी दिले हेही तूम्हाला आठवत नसेल. कारण, शॉपिंगला जाण्यासाठी तूम्ही तिला पैसे तर देता पण वेळ देऊ शकत नाही. त्यामूळे तिला पहिल्यांदा भेटलात तेव्हा जे काही दिले होते ते गिफ्ट परत दिले तरी तूमच्या जून्या आठवणीत ती रमून जाईल.

तीला आवडणारी स्टाईल करा

पत्नीला काय आवडते हे तरी आतापर्यंत तूमच्या लक्षात आलेच असेल. त्यामूळे तिला जसे आवडते तसेच रहा. म्हणजे, ज्या दिवशी प्रपोज करणार आहात तेव्हा एखाद्या छान कॅंडल लाईट डिनरला जाण्यास काहीच हरकत नाही.

गप्पा हेच सोल्युशन

एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारून किती वर्ष उलटली आहेत, याचा काही अंदाज नसतो. जो तो उठला कि आपल्या रूटीनच्या मागे लागतो. पण, डेटवर गेल्यावर सोशल मिडिया, फोन, मित्र सगळं बाजूला ठेऊन एकमेकांबद्दल बोला. सुरूवातीचे दिवस आठवा आणि गुलाबी क्षणाना उजाळा द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT