Protein Shake Vs Green Tea esakal
लाइफस्टाइल

Protein Shake Vs Green Tea: प्रोटीन शेक की ग्रीन टी? नेमकं वजन कशाने कमी होतं जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी नेमका कोणता प्रोटीन शेक प्यावा किंवा कोणती ग्रीन टी प्यावी याबाबत लोकांना अजूनही संभ्रम आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Weight Loss Tips: वजन वाढल्याच्या समस्येने सध्या बरेच लोक त्रस्त आहे. आणि ते आटोक्यात आणण्यासाठी लोक वाटेल ते उपायही करून बघतात. आपला अयोग्य आहात त्याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरत असतो. वजन कमी करण्यासाठी काही लोक प्रोटीन शेक पितात तर काही लोक ग्रीन टी पितात. मात्र वजन कमी करण्यासाठी नेमका कोणता प्रोटीन शेक प्यावा किंवा कोणती ग्रीन टी प्यावी याबाबत लोकांना अजूनही संभ्रम आहे. हाच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत.

प्रोटीन शेकचे फायदे

जेव्हा तुम्ही प्रोटीनचे सेवन करता तेव्हा ते पचवण्यासाठी तुम्हाला दुप्पट कॅलरीजची गरज असते. मात्र हेही तेवढेच खरे की शरीरात साठलेल्या प्रोटीनने हळू हळू तुमची चरबी कमी व्हायला सुरुवात होते. प्रोटीन शरीराला आकार देण्यासही मदत करतात.

ग्रीन टीचे फायदे

ग्रीन टी चयापचनाचा बूस्टर मानली जाते. नियमित ग्रीन टी पिल्याने तुमची चयापचन शक्ती चांगली राहाते व त्यामुळे हळू हळू तुमचं वजन कमी होऊ लागते. ग्रीन टी ही अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. त्यामुळे तुमचा थकवा दूर होतो आणि त्याच्या कॅलरीजही फार कमी असतात.

प्रोटीन शेक की ग्रीन टी काय वजन कमी करण्यास योग्य ठरू शकते?

प्रोटीन आणि ग्रीन टी दोन्ही वजन कमी करण्यास कारणीभूत आहेत. मात्र हे दोन्ही पेय शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. नुसतं प्रोटीन शेक किंवा ग्रीन टी पिऊन वजन कमी करता येत नाही. त्यासाठी हे दोन्ही पेय पिण्याची योग्य वेळही जपावी लागते. तेव्हाच तुमचं वजन कमी होऊ शकतं. अन्यथा जास्त प्रमाणात प्रोटीन शेक प्यायल्यानेही वजन वाढतं. जर तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेत असाल तर दिवसातून एक ते दोन कप ग्रीन टी तुम्ही पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT