Raksha Bandhan 2021 esakal
लाइफस्टाइल

'रक्षाबंधन' कधी आहे माहितीय? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

राखी बांधण्याची शुभ वेळ आणि योग्य वेळ जाणून घ्या

बाळकृष्ण मधाळे

Raksha Bandhan 2021 : 'रक्षाबंधन' म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचं बंधन! या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून भावाचं ह्रदय प्रेमानं जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचं प्रेम निस्वार्थी आणि पवित्र मानलं जातं. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. या सणादिवशी बहीण बाजारातून सुंदर राखी खरेदी करते व घरामध्ये सुंदर पाठ मांडून पाटाभोवती रांगोळी काढते. भावाला पाठावर बसवते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते व त्याला ओवाळते.

'रक्षाबंधन' हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.

2021 मध्ये रक्षाबंधन कधी आहे?

यावर्षी रविवार, 22 ऑगस्ट 2021 रोजी भारतात हा सण साजरा केला जाईल. या दिवशी राखी बांधण्याची शुभ वेळ रविवार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 06:15 ते 05:31 दरम्यान आहे. हिंदू पंचांगानुसार (Hindu Panchang), हा सण श्रावण महिन्याच्या (Shravana Month) पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. या पौर्णिमेला राखीपौर्णिमा (Rakhi Purnima 2021) देखील म्हणतात.

Raksha Bandhan 2021

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त (Date, Time and Significance)

  • रक्षाबंधन - रविवार 22 ऑगस्ट 2021

  • राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त - 06:15 AM ते 05:31 PM, 22 ऑगस्ट 2021

  • रक्षाबंधन मुहूर्त - 01:42 PM ते 04:18 PM, 22 ऑगस्ट 2021

  • रक्षाबंधन भद्रा समाप्ती वेळ - 06:15 AM

  • रक्षाबंधन भद्रा पंचमी - 02:19 AM ते 03:27 AM

  • रक्षाबंधन भद्रा मुख - सकाळी 03:27 AM ते 05:19 AM

  • पौर्णिमा तिथीस प्रारंभ - 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07:00 PM

  • पौर्णिमा तिथी समाप्ती - 22 ऑगस्ट, वेळ - 05:31 PM

रक्षाबंधनाचे महत्व (Raksha Bandhan Significance)

रक्षाबंधन हा हिंदू सण आहे. जो भारताच्या विविध भागात साजरा केला जातो. मॉरिशस आणि नेपाळमध्ये देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून रक्षाबंधन सण साजरा केला जात असून हा मुख्य हिंदू उत्सवांपैकी एक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो, अशी कामना करते.

राखी बांधण्याचा अर्थ : ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे, हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT