Home Decor Idea: Sakal
लाइफस्टाइल

Home Decor Idea: रक्षाबंधननिमित्त घराला द्या नवा लूक, पाहुणे पाहतच राहतील

Raksha Bandhan Home Decor Ideas: रक्षाबंधनाचा सण अगदी जवळ आला आहे. अनेकांनी रक्षाबंधनाची तयारी देखील सुरू केली असणार आहे. यंदा घराला नवा लूक द्यायचा असेल काही गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

पुजा बोनकिले

Raksha Bandhan Home Decor Ideas: श्रावण महिना सुरू होताच श्रावण विनायक चतुर्थी, नागपंचमी, रक्षाबंधन यासारख्या अनेक सणांना सुरूवात होते. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. अनेक घरांमध्ये तयारी सुरू झाली असणार आहे. यंदा रक्षाबंधननिमित्त घराला नवा लूक द्यायचा असेल तर पुढील काही सोप्या गोष्टी करू शकता. यामुळे घरी आलेले पाहुणे देखील तुमचे कौतुक करतील.

Home Decor Idea

पडदे बदलावे

घराला नवा लूक द्यायचा असेल तर सर्वात आधी दाराचे आणि खिडक्यांचे पडदे बदलावे. वेगवेगळे पडदे लावल्याने घराचा लूक बदलतो. रक्षाबंधनसाठी खास पडदे खरेदी करू शकता. आजकाल कलरफुल आणि एम्ब्रॉयडरी पडदे लावण्याचा ट्रेंड आहे. यामुळे घर देखील आखर्षक दिसेल.

फोटो वॉल बनवा

रक्षाबंधनला घराची खास सजावट करायची असेल तर तुम्ही फोटो वॉल तयार करू शकता. तुम्ही बहिण- भावाचे लहानपणीचे फोटो, कोट तयार करून सजावट करून भिंतीवर लावू शकता. तसेच फेरी लाइटिंगचा वापर करून अधिक आखर्षक बनवू शकता. ही फोटो वॉल तुमच्या घराला सुंदर लुक तर देईलच पण तुमच्या भावाला किंवा बहिणीलाही खास वाटेल.

लाइटिंग

रक्षाबंधनला लाइटिंगची सुंदर सजावट करून घराला आकर्षक लूक देऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना लाइटिंगने सजवू शकता. याशिवाय रंगीबेरंगी लाइटिंग बाजारात उपलब्ध आहेत. हे अगदी फॅन्सी देखील दिसतात आणि संपूर्ण घराला एकदम सुंदर लूक देण्यात मदत करतात.

फुलांचा वापर करा

रक्षाबंधननिमित्त घराला सुंदर आणि रंगीत फुलांची सजावट करू शकता. फुलांचा सुगंधाने संपुर्ण घर भरून जाईल. घराच्या प्रवेशद्वारावर फुलांनी बनवलेली कमान लावू शकता. तसेच मंदिराला सुंदर सजावट करू शकता. घरातील पडद्यावरही फुले लावू शकता. यामुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT