Raksha Bandhan 2024 esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024 : राखी पौर्णिमेवरती आहे भद्रकाळाचं सावट, भावाला राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता ?

Bhadrakal In Rakhi Pornima: ज्योतिष शास्त्रात भद्रकाळाला अशुभ मानलं जातं. त्यामुळे लोक या काळात कोणताही शुभ काम करत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan 2024 :

श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाच्या सणांची रेलचेल असते. श्रावणात नागपंचमी, गोकुळाष्टमी सोबतच राखी पौर्णिमा सुद्धा असते. बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा हा सण आहे. यंदा 19 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा आहे.

रक्षाबंधन दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाची वाट पाहत असते. भावासाठी सुंदर अशा राख्या ती बनवते. राखी पौर्णिमा हा भावावर असलेल्या तिच्या प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळेच भाऊ-बहीण हा दिवस भेटणं टाळत नाहीत. ज्या लोकांना या दिवशी भेटणे शक्य नसतं ते आपली राखी आणि भेटवस्तू एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात. (Raksha Bandhan 2024 )

दरवर्षी पौर्णिमेला येणारा हा सण यंदा मात्र कोड्यात टाकणारा आहे. कारण राखी पौर्णिमेदिवशी भद्रकाळ घडणार आहे. ज्योतिष शास्त्रात भद्रकाळाला अशुभ मानलं जातं. त्यामुळे लोक या काळात कोणताही शुभ काम करत नाहीत. त्यामुळेच आज आपण राखी पौर्णिमेदिवशी येणाऱ्या भद्रकाळावर मात कशी द्यायची. आणि भावाला कुठल्या वेळी राखी बांधायची याची माहिती घेऊयात.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरिद्वार मधील ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री यांनी सांगितलं की, 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे. पण हा संपूर्ण दिवस शुभ नाही. या दिवसावरती भद्रकाळाचे सावट आहे. त्यामुळे भाऊ बहिणीला राखी बांधण्यासाठी दुपारनंतरची वेळ शुभ राहील. भावाला राखी बांधण्यासाठी दुपारी 1.30 नंतर ची वेळ शुभ आहे.

भद्रकाळात राखी बांधली तर काय होईल

ज्योतिष शास्त्रात भद्रकाळाला अशुभ मानलं जातं. कारण या काळात केलेलं कुठलंच काम पूर्णत्वास जात नाही. त्यामुळेच या काळात कुठलंही चांगलं काम केलं जात नाही. तुम्ही भावाला राखी बांधण्यासाठी दुपारनंतरची वेळ निवडा.

तुम्ही या भद्रकाळात भावाला राखी बांधलीत तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी अशुभ ठरेल. या काळात कार्य केल्याने त्या व्यक्तींना अनेक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यांच्या मागे सतत दवाखाना लागेल. त्यामुळे या काळात कुठलेही शुभकाम करू नका आणि भावाला राखी सुद्धा बांधू नका, अशी माहिती ही ज्योतिषी श्रीधर शास्त्री यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT