Independence Day sakal
लाइफस्टाइल

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी आपले घर आणि ऑफिस सजवा या सुंदर रांगोळीने, पाहा सुंदर डिझाइन

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी १५ ऑगस्टचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Aishwarya Musale

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी १५ ऑगस्टचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. देशभक्तीपर गाण्यांपासून ते रांगोळीच्या रंगांनी घर सजवण्यापर्यंत विविध प्रकारे स्वातंत्र्याचा उत्सव खास बनवता येतो. लोक या दिवशी आपल्या घरी, शाळा-कॉलेज आणि ऑफिसमध्ये रांगोळी काढतात.

जर तुम्ही स्वातंत्र्यदिनी रांगोळी काढणार असाल तर तुम्ही येथून काही कल्पना घेऊ शकता.येथे आम्ही अशाच काही रांगोळी डिझाइन्स शेअर करत आहोत, ज्या तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि हा दिवस एका खास पद्धतीने साजरा करू शकता.

तिरंगा रांगोळी

स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये तिरंगा रांगोळी काढू शकता. ही रांगोळी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि ती बनवायलाही सोपी आहे. या रांगोळीने घर किंवा ऑफिसचा एंट्री पॉइंट सजवता येतो. ही पोस्ट पाहून तुम्ही सहज रांगोळी काढू शकाल.

फुलांची रांगोळी

स्वातंत्र्यदिनी तुम्ही फुलांची रांगोळीही काढू शकता. मध्यभागी राष्ट्रध्वज बनवून त्याच्या सभोवताली विविध रंगांची फुले तयार करून सजवू शकता.रांगोळीच्या मध्यभागी स्टार काढून त्याला पारंपरिक रूप देऊ शकता.

मोठ्या अंगणात किंवा हॉलमध्ये रांगोळी काढायची असेल तर तीन रंगांनी सजवलेली गोल रांगोळी काढता येते. ही रांगोळीची डिजाइनही अतिशय आकर्षक दिसेल. ते अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही फ्लोरल डिजाइन क्रिएट करू शकता.

नकाशा रांगोळी

जर तुम्हाला रांगोळीला थोडे क्रिएटिव्ह डिझाइन द्यायचे असेल तर तुम्ही भारताच्या नकाशासह रांगोळी देखील बनवू शकता. हे डिझाइन जितके अधिक क्रिएटिव असेल तितके ते अधिक सुंदर दिसेल. भारताचा नकाशा तयार करण्यासाठी तुम्ही त्याचा आकार वापरू शकता. ते अधिक सुंदर बनवण्यासाठी त्याभोवती फ्लोरल डिजाइन करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT