Ratan Tata: आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक चे सुपुत्र हॉटेल ताज मध्ये ४० वर्ष शेफ म्हणून काम केलेले प्रभाकर रोकडे व पद्मविभूषण रतन टाटा  Sakal
लाइफस्टाइल

Ratan Tata: आंबेगाव तालुक्यातल्या तरुणाने बनवलेल्या मशरूम सूपचे फॅन होते रतन टाटा! दर शनिवारी ब्रेकफास्टला...

Ratan Tata: हॉटेल ताज चे शेफ प्रभाकर रोकडे यांनी बनवलेला मशरूम सूप, मशरूम आम्लेट चा ब्रेक फास्ट रतन टाटा यांना खुप आवडायचा. दर शनिवारी ब्रेक फास्टच्या निमित्ताने रतन टाटा व रोकडे यांची व्हायची भेट होत होती.

सकाळ वृत्तसेवा

सुदाम बिडकर

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक मधील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले व मुंबईतील हॉटेल ताज मध्ये ४० वर्ष शेफ म्हणून काम केलेल्या प्रभाकर नामदेव रोकडे यांनी बनवलेला मशरूम सूप, मशरूम आम्लेट बरोबर टोस्ट चा ब्रेक फास्ट टाटा उद्योग समूहाचे चेअरमन ऑफ एमिरेट्स, ज्येष्ठ उद्योगमहर्षीं, पद्मविभूषण रतन टाटा यांना आवडायचा हि आठवण सांगताना श्री. रोकडे यांना गहिवरून आले. दर शनिवारी रतन टाटा ब्रेक फास्ट करण्यासाठी ताज मध्ये नित्यक्रमाने यायचे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक चे सुपुत्र प्रभाकर रोकडे हे मुंबई येथील ताजमहाल हॉटेल मध्ये शेफ म्हणून १९८० मध्ये रूजू झाले ४० वर्षाच्या सेवेनंतर २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले श्री. रोकडे ताजमहाल हॉटेल मध्ये शेफ म्हणून ४० वर्ष काम केले. रतन टाटा प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा वाजता ताज च्या सी- लॉज ‌विभागामध्ये ब्रेकफास्ट करायला यायचे त्यावेळी त्यांचा मशरूम सूप, मशरूम आम्लेट बरोबर टोस्ट असा त्यांचा आवडता नाष्टा असायचा असा त्यांचा नित्यक्रम असायचा त्यामुळे दर शनिवारी रतन टाटा साहेब व माझी भेट व्हायची ते माझी आस्थेवाईकपणे विचारपुस करायचे या आठवणी सांगताना श्री. रोकडे यांना गहिवरून आले.

श्री. रोकडे यांनी हॉटेल ताज मध्ये प्रामाणिक सेवा केल्याबद्दल त्यांना पुन्हा २०२२ पासून व्यवस्थापनाने हिस्टोरीयन म्हणून रुजू केले आहे. श्री. रोकडे आता हॉटेल ताज ला भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांना हे हॉटेल किती साली, कोणी बांधले , त्याला किती खर्च झाला याची माहिती सांगायचे काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ दोन विद्यार्थ्यांचीही CBI चौकशी

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT