Ratan Tata Passes Away:  Sakal
लाइफस्टाइल

Ratan Tata: उतरत्या वयात रतन टाटांचं शरीर झुकलेलं का होतं? वृद्धापकाळात मानवी शरीरात का होतो हा बदल, वाचा सविस्तर

Ratan Tata Passes Away: टाटा समूहाचे ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला वृद्धापकाळाने निधन झाले. शेवटच्या काळी शरीर वाकलेले होते. वाढत्या वयानुसार शरीर का झुकले जाते हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Ratan Tata Passes Away: टाटा समूहाचे ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमद्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना लो ब्लडप्रेशरचा त्रास होता. ते नियमितपणे तपासणीसाठी जात असे. रतन टाटा यांचे शरीर शेवटच्या काळी झुकलेले होते. चला तर मग जाणून घेऊया वृद्धापकाळात शरीर का झुकले जाते.

वाढत्या वयात शरीर का झुकते?

स्नायू आणि हाडं कमकुवत होतात

वाढत्या वयात शरीरातील स्नायू आणि हाडं कमकुवत होतात. यामुळे शरीर झुकायला लागते. तसेच हाडांची घनता कमी होते, त्यामुळे शरीर वाकते.

स्नायू कमकुवत होणे

वाढत्या वयाबरोबर स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते आणि कुबड निघते.

लठ्ठपणाची समस्या

वाढत्या वयाबरोबर स्पाइनल डिस्क कमकुवत होते. त्यामुळे शरीर झुकायला लागते. तसेच लठ्ठपणामुळे शरीराचे वजन वाढते त्यामुळे शरीर वाकायला सुरूवात होते.

व्हिटॅमिन डीची कमतरता

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरातील हाडांची घनता कमी होते. यामुळे शरीर वाकायला सुरूवात होते. आजकाल बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. या जीवनसत्वाची कमतरता सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न आल्याने उद्भवते.

बसण्याची चुकीची पद्धत

जास्त वेळ बसण्याच्या किंवा उभ्या राहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे मणक्यावर दबाव येतो. यामुळे वयाबरोबर कंबर वाकण्याची शक्यता वाढते.

अनुवांशिकता

धुम्रपान आणि दारू पिणे यासारख्या अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळेही शरीर झुकू शकते. काही लोकांना अनुवांशिक कारणांमुळे शरीर वाकण्याची समस्या असू शकते. म्हातारपणी हाडं कमकुवत होऊ नयेत यासाठी लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्यकडे लक्ष द्यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT