Raw Mango Sakal
लाइफस्टाइल

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Raw Mango Recipe:उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी कैरीचा थंडगार कचुंदा नक्की ट्राय करू शकता.

सकाळ वृत्तसेवा

निर्मला दरगड

raw mango Chilled Kachunda juice Know Recipe

उन्हाळ्यात कुरड्या, तांदळाचे पापड, खारोड्या, लोणचे, नागलीचे पापड, साबुदाण्याच्या पापड, कुरडई, साबुदाण्याच्या पापड यांना अगदी उधाण येते. आंबावडी आता विकत मिळत असली तरी आम्ही मात्र अजूनही आंबावडी करतो. या ऋतुत लिंब महाग मिळतात आणि वेळेवर पाहुणे आले की, गडबड होते. त्यामुळे आमच्या घरी कैरीचा कचुंदा हमखास असतो.

कैरीचा कचुंदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कैरी

साखर

काळे मीठ

भाजलेले जीरं

विलायची पावडर

मीठ चवीनुसार

बर्फ

कैरीचा कचुंदा बनवण्याची कृती

कैरीचा कचुंदा करण्यासाठी कैरी उकडून घ्यायच्या. उकडलेल्या कैरीचा गर काढून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. पाणी गरम करुन गर टाकायचा. त्यात साखर, काळे मीठ, भाजलेले जिरे, विलायची पूड व साधे मीठ टाकायचे. मंद आचेवर हा गर आटवून घ्यावा. थंड झाल्यावर हा गर बरणीत भरुन घ्या. ऐनवेळी मिक्सरमध्ये पाणी घालून त्यात थोडासा गर टाकून मिक्सर एकवेळ फिरवा. बर्फ टाकून गारेगार शरबत तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT