Real Weight Loss Journey  Sakal
लाइफस्टाइल

Real Weight Loss Journey : वर्षभरात तब्बल 24 kg वजन घटवलं, आता दिग्दर्शक राजमौलीसह अनेक सेलिब्रिटींना देतेय ट्रेनिंग

Real Weight Loss Journey News या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरनं डाएट व एक्सरसाइजचे योग्यरित्या नियोजन आखत 24 kg वजन घटवलं.

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या लाइफस्टाइलनुसार हल्ली पुरुषांसह महिलांमध्येही फिटनेसची (fitness news in marathi) क्रेझ वाढत आहे. पुरुषमंडळी कित्येक वेळात वेळ काढून जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. पण महिलांबद्दल सांगायचे झाले तर घरासह ऑफिसमधील असंख्य जबाबदाऱ्यांमुळे कित्येकजणींना स्वतःच्याच आरोग्याची काळजी घेण्याकरिता वेळ काढणे म्हणजे मोठा टास्कच असतो.

पण अशाही काही महिला आहेत, ज्या घरगुती जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडून कंटाळा न करता निरोगी आरोग्यासाठी नियमित वर्करूटीन फॉलो करतातच. या लेखाद्वारे आपण अशाच एका महिलेची यशोगाथा पाहणार आहोत, जिनं कुटुंबीयांचा सांभाळ करत स्वतःच्या फिटनेस जर्नीमध्ये खंड पडू न देता आजही कायम सुरू ठेवली आहे.

या महिलेनं वयाची पंचेचाळिशी ओलांडलीय पण त्यांचे मसल्स व शरीरयष्टी पाहून त्यांच्या वयाचा कोणीही अंदाज लावू शकत नाही, बरं का!. चला तर जाणून घेऊया ‘फॅट टू फिट जर्नी’  

कोण आहे ही महिला?

वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही स्वतःच्या आरोग्याची (Health Care Tips In Marathi) अशा पद्धतीने काळजी घेणाऱ्या या महिलेचं नाव किरण डेंबला असे आहे.

किरण या हैदराबाद येथील रहिवासी आहे. महत्त्वाचे म्हणजे किरण या एक गृहिणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी फिटनेसच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलं आणि आता त्या सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर देखील आहेत.

कोणत्या कारणामुळे वाढले होते वजन?

१९९९ साली किरण या विवाहबंधनात अडकल्या, यानंतर संसाराच्या रगाड्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसे. यादरम्यान २००३ साली त्यांनी एका मुलीला जन्म दिला व काही काळानं एका मुलालाही जन्म दिला.

सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांना एका आजाराने ग्रासले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या औषधोपचार घेत होत्या. पण मुलांची देखभाल, घराची जबाबदारी व औषधोपचारामुळे त्यांचे शारीरिक वजन वाढून तब्बल ७४ किलोग्रॅमपर्यंत पोहोचले.

मुले मोठी झाल्यानंतर किरण यांनी विचार केला की आता वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. घराजवळीलच एका जिममध्ये जाऊन त्यांनी छोटे-मोठे व्यायाम करण्यास सुरुवात केली. येथे येणाऱ्या लोकांना भेटून, चर्चा करून त्यांना फिटनेसबाबत प्रेरणा मिळत होती. तसंच प्रशिक्षकांचा सल्ला व मेहनत घेऊन त्यांनी शरीराचे वाढलेले वजन घटवलेच.

फिटनेसची आवड निर्माण झालेल्या किरण इथवरच थांबल्या नाहीत, पुढे त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवलं. वर्षभरात तब्बल २४ किलोग्रॅम वजन कमी केल्यानंतर त्यांनी मसल्स ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत केलं आणि काही काळातच सिक्सपॅक अॅब्सही बनवले.

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर

यादरम्यान किरण यांनी फिटनेस कोर्सही पूर्ण केले. हैदराबादमध्ये आज त्यांच्या मालिकीचे तीन जिम सेंटर आहेत. तसंच काही सेलिब्रिटींनाही त्या फिटनेस धडे देताहेत. यामध्ये बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली, अभिनेत्री तमन्ना भाटिया यासारख्या कित्येक कलाकारांचा समावेश आहे.

किरण यांचे डाएट

किरण आपल्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश करतात. ज्यामध्ये पनीर, चिकन, अंडे, मासे, दाळींचा समावेश असतो. याव्यतिरिक्त फायबरयुक्त हिरव्या पालेभाज्यांचेही त्या सेवन करतात. शिवाय वेळेनुसार आपल्या डाएट प्लानमध्ये त्या बदल करत असतात.

वर्कआऊट प्लान

किरण दररोज जवळपास एक ते दोन तास एक्सरसाइज करतात. विशेष म्हणजे घरातील सर्व काम देखील त्या स्वतःच करतात. ज्याद्वारे दिवसभर अॅक्टिव्ह राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT