Reason of Lame Horse killing
Reason of Lame Horse killing sakal
लाइफस्टाइल

रेसमध्ये लंगड्या झालेल्या घोड्यांना का मारलं जातं? जाणून घ्या कारण!

सुरज सकुंडे

घोडा हा अत्यंत देखणा आणि उपयुक्त प्राणी आहे. प्राचीन काळापासून घोड्याचा वापर केला जातो. राजा-महाराजांच्या रथाला घोडेच असत तसेच घोड्यांचा उपयोग लढायांमध्ये खूप महत्त्वाचा ठरत असे. सर्वसामान्य लोकही घोड्याचा उपयोग करत. अलीकडच्या काळात घोड्याचा उपयोग तसा बराच कमी झाला आहे. परंतु घोड्यांच्या शर्यती (Horse Race) या आजही खूप प्रसिद्ध आहे. अनेक जातीवंत आणि लाखो-करोडो रुपये किंमतीचे महागडे घोडे या शर्यतींमध्ये पळत असतात आणि त्यांच्यावर मोठी बक्षिसे दिली जातात.

घोड्यांच्या रेसवर जगभरातील विविध देशांत सट्टाही लावला जातो. अनेक श्रीमंत लोक या शर्यतींवर आणि घोड्यांवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात. परंतु घोडे रेसमध्ये जखमी होऊन लंगडे (Lame Race Horses) झाल्यास त्यांना मारून (Killed) टाकलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? हो, हे खरं आहे. रेसमध्ये धावणारे हे घोडे जातीवंत आणि महागडे असूनही त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना मारलं का जाते? हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Reason of lame race horses are killed instead of treated)

आता प्रश्न पडतो की लंगड्या घोड्यांना मारलं का जाते? अलीकडच्या काळात तंत्रज्ञान एवढं प्रगत असतानाही हा मार्ग क्रूर अवलंबला जातो? जसं की आपण जाणतो शर्यतीमध्ये धावणाऱ्या घोड्याचं शरीर मजबूत आणि चपळ असणं गरजेचं आहे. खासकरून घोड्यांचे पाय मजबूत असणे महत्त्वाचं असते. परंतु रेसमध्ये पायांना गंभीर दुखापत झाल्यास या दुखापतीतून सावरणं घोड्यांना कठीण जाते. कारण घोड्यांना दीर्घकाळ उपचार सहन करता येत नाहीत. तशी ताकद त्यांच्याकडे नसते.

आता प्रश्न पडेल की घोड्याला ते उपचार (Treatment) सहन का करता येत नाहीत? याचं कारण घोड्याच्या शरीरचनेत दडलंय. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल की घोड्याला इतर प्राण्यांप्रमाणे बसता येत नाही. कारण त्याला इतर प्राण्यांसारखा त्याला गुडघ्याचा सांधाच नसतो. त्यामुळे त्याला पाय दुमडता येत नाही. त्यामुळे घोडा जास्तीक जास्त वेळ उभा असतो. रेसच्या घोड्याच्या शरीरातील 205 पैकी 80 हाडे ही त्याच्या पायात असतात आणि त्यांवर घोडे आपल्या संपुर्ण शरीर पेललं जाते. ही हाडे हलकी असल्यामुळे घोड्याचा पाय मोडल्यास तो जोडणं कठीण होऊन बसते.

त्यात घोड्याच्या पायाला दुखापत झाल्यास त्याला कुत्र्यासारख्या प्राण्याप्रमाणे तीन पायांवर चालताही येत नाही. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरणं कठीण होतं आणि त्यामुळे दुखापत जर किरकोळ असेल तर त्याच्यावर उपचार केले जातात. परंतु दुखापत जर गंभीर असेल आणि त्यातून घोडा बरा होणार नाही हे डॉक्टरांनी (Animal Doctors) स्पष्ट केल्यास त्याचा प्राण घेण्याचा निर्णय घेतला जातो. घोड्याच्या दृष्टीनेही हेच फायदेशीर असल्याचे पशुवैद्य मानतात. दरवर्षी हजारो घोड्यांचा अशा प्रकारे प्राण घेतला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT