Kitchen Tips Esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips: अन्न शिजवलेल्या भांड्यात का जेऊ नये, जाणून घ्या त्या मागची कारणे...

तुमच आरोग्य नीट ठेवायच असेल तर चुकूनही अन्न शिजवलेल्या भांड्यात तेच अन्न खाऊ नका.

सकाळ डिजिटल टीम

लहानपणी जर तुम्ही चुकून पातेलं, कढई अथवा तव्यावरील एखादा पदार्थ तसाच खाल्ला तर आजी लगेच ओरडायची. आणि सांगायची की अन्न शिजवलेल्या भांड्यात कधीच काही खाऊ नये.

का खाऊ नये ? असा प्रश्न विचारला तेव्हा आजी सांगायची “शास्त्र असतं ते”

ही झाली लहानपणीची गोष्ट पण आता जर का तुम्हाला तुमच्या तरुणपणात फिट राहायचं असेल, तुमच आरोग्य नीट ठेवायच असेल तर चुकूनही अन्न शिजवलेल्या भांड्यात तेच अन्न खाऊ नका.

जाणून घ्या अन्न शिजवलेल्या भांड्यात का खाऊ नये.

1) अन्न शिजवलेली भांडी चिकट असतात .

अन्न शिजवताना तेल, तिखट भरपूर प्रमाणात वापरण्यात येतं. ज्यामुळे पदार्थ रूचकर आणि चविष्ट होतात. पण असं करताना कढई, तवा अथवा पातेल्याच्या तळाशी त्या पदार्थांमधील तिखट तेल जमा होतं. अन्नपदार्थ संपल्यावरही ते तेल तळाशी तसंच राहतं. त्यामुळे जर एखाद्याने भांडे रिकामं झालं आहे म्हणून कढई अथवा तव्यात जेवण केलं तर ते सर्व तेल त्या व्यक्तीच्या पोटात जातं. आरोग्यासाठी हे मुळीच योग्य नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

2) अन्नसंस्काराची एक पद्धत असते.

अन्न शिजवण्याची आणि जेवणाची एक पद्धत पूर्वजांनी घालून दिलेली आहे. अन्न शिजवणं आणि खाणं या केवळ साध्या क्रिया नसून शरीरावर केला जाणारा संस्कार आहे. त्यामुळे अन्न शिजवण्याची भांडी वेगळी आणि जेवणाची पाने, वाट्या, चमचे वेगळे असणं हे सभ्यतेचं लक्षण समजलं जातं. घरात असो वा समाजात आपण सभ्यतेने वागण्यासाठी घालून दिलेले हे संस्कार प्रत्येकाने सांभाळायला हवेत. म्हणून कधीच अन्न शिजवलेल्या भांड्यात जेवू नये.

3) तुमचे पोटाचे आरोग्य बिघडू शकते.

अन्न शिजवण्याची भांडी खूप चिकट असतात. त्यामुळे ती स्वच्छ करण्यासाठी जास्त साबणाची गरज लागते.पूर्वीच्या काळी चुलीतील राखेने भांडी स्वच्छ केली जात असत. चांगली स्वच्छ केल्यावरही कधी कधी अशा भांड्यांना काही अंश राखेचा अथवा साबणाचा राहत अते. अशा भांड्यात जेवल्यास तो साबण, राखेचा अंश पोटात जाऊन तुमचे पोट बिघडण्याची शक्यता वाढू शकते. यासाठी पूर्वीपासून मोठी माणसं अन्न शिजवलेल्या भांड्यात खाऊ नये असं सांगत असत.

4) सर्वसामान्य महिलांमध्ये असा समज आहे की, अन्न शिजवलेल्या भांडयातच खाल्ले की गरिबी येते. म्हणून बेसण केल किंवा तूप केलं, तर आई त्याचं खरडन तुम्हाला त्या कढईत किंवा पातेल्यात खाऊ देत नाही.

5) अन्न शिजवलेल्या भांड्यात जेवन केल तर घरातील अन्नपुर्णा देवी कोपते असे देखील सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT