Besan Cutlet sakal
लाइफस्टाइल

Besan Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा गरमा गरम ‘बेसनाचे कटलेट’, अगदी सोपी आहे पद्धत, जाणून घ्या रेसिपी

नाश्त्यासाठी बनवा गरमा गरम ‘बेसनाचे कटलेट’

Aishwarya Musale

सकाळी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. रोज तेच पोहे, शिरा, उपीट खाऊन घरातही सर्वांना कंटाळा येतो. काळजी करून नका आम्ही तुमच्यासाठी काहीतरी स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ घेऊन आलो आहोत. तुम्ही नाश्त्यासाठी बेसन पोहे कटलेट करू शकता.

झटपट तयार होणारे बेसन पोहे कटलेट खायला चवदार आणि खुसखुशीत आहे. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ते खाऊ शकता. जर तुम्हाला पोहे आणि पकोडे दोन्ही आवडत असतील तर तुम्हाला बेसन पोहे कटलेटमध्ये दोन्हीचे कॉम्बिनेशन मिळेल. चला जाणून घेऊया ही रेसिपी बनवण्याची सोपी पद्धत.

बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पोहे - ४ वाट्या

  • बेसन - १ वाटी

  • रवा - १ कप

  • चिरलेला कांदा - २

  • बारीक चिरलेली मिरची – ३

  • कोथिंबीर - 1 कप

  • मिरची पावडर - 1 टीस्पून

  • हळद - 1 टीस्पून

  • जिरे पावडर- 1 टीस्पून

  • चाट मसाला- 1 टीस्पून

  • रिफाईंड तेल - (आवश्यकतेनुसार)

  • मीठ - चवीनुसार

बेसन पोहे कटलेट कसे बनवायचे

चवदार बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी, प्रथम पोहे 5 ते 7 मिनिटे पाण्यात भिजवा. तोपर्यंत बेसन भाजून घ्या. आता त्यात रवा, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ घाला. भाजलेले बेसन थंड झाल्यावर पोह्यात घालून चांगले मळून घ्या. यानंतर तळहातावर थोडे तेल लावून पोह्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हवा तो आकार द्या.

कढईत तेल गरम करून कटलेट मंद आचेवर तळून घ्या. लक्षात ठेवा कटलेट्स फक्त मंद आचेवर तळून घ्या, नाहीतर बाहेरून शिजलेले दिसतील आणि आतून कच्चे राहतील. दोन्ही बाजूंनी चांगले तळून घेतल्यानंतर, कटलेट टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. आता तयार कटलेट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT