Onion Paratha  sakal
लाइफस्टाइल

Onion Paratha Recipe : नाश्त्यात बनवा टेस्टी ओनियन पराठा, ही सोपी रेसिपी नोट करा..

नाश्त्यासाठी बनवा कांद्याचा पराठा, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Aishwarya Musale

हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक घरांमध्ये पराठे तयार केले जातात आणि खाल्ले जातात. हा पराठा तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता, पण सकाळच्या नाश्त्यात त्याचा जास्त उपयोग होतो. आलू पराठा, गोबी पराठा यासह पराठ्यांचे अनेक प्रकार घरांमध्ये लोकप्रिय आहेत. पण तुम्ही कधी कांदा पराठा तयार करून खाल्ले आहे का?

सर्व वयोगटातील लोकांना ते खूप आवडते. तुम्ही ते फक्त मुलांच्या टिफिनमध्येच देऊ शकत नाही तर तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही देऊ शकता. हा पराठा तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. कांदा पराठा कसा बनवायचा, चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊया.

कांदा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ- 2-3 वाट्या

कांदा - 2-3

आले-लसूण पेस्ट- 2 टीस्पून

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून

ओवा - 1/2 टीस्पून

चाट मसाला- 1 टीस्पून

तूप - 4 टीस्पून

हिरवी मिरची- 3-4

कोथिंबीर चिरलेली – 2 चमचे

मीठ - चवीनुसार

कांदा पराठा कसा बनवायचा

स्वादिष्ट कांद्याचा पराठा ही नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कांद्याचे पातळ आणि लांब तुकडे करून घ्या. यानंतर कांद्यामध्ये ओवा, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इतर सर्व मसाले घालून चांगले मिसळा आणि झाकून ठेवा आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ चाळून त्यात 1 चमचा तूप/तेल घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे गोळे बनवा आणि प्रथम एक गोळा घेऊन लाटून घ्या. लाटून घेतल्यानंतर त्याच्या बरोबर मधोमध हे कांद्याचे तयार सारण भरावे. आता एक नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तूप टाकून सर्वत्र पसरून घ्या, मग लाटलेला पराठा बेकिंगसाठी ठेवा. नंतर पराठा पलटी करून वर थोडं तूप लावून भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

आता एका प्लेटमध्ये पराठा काढा. याच पद्धतीचा अवलंब करून सर्व कांद्याचे पराठे एक एक करून तयार करा. नाश्त्यासाठी चविष्ट कांदा पराठा तयार आहे. आता तुम्ही ते चटणी, सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT