Relationship Esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: नात्यात दुरावा येतोय, या 5 चुका तर करत नाही ना?

तुमचा पार्टनर तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे का?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक व्यक्ती आनंदी जीवनाचे स्वप्न पाहत असते. मात्र कधीकधी नकळत हातातून अशा काही चुका होतात ज्यामुळे दोघांच्या नात्यांमधील (Relationship)अंतर वाढत जाते. आणि नंतर ते हाताळणे अशक्य होवून बसते. तुमचा पार्टनर तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे का? नात्यात पूर्वीसारखी जिव्हाळा राहिलेला नाही, असे तुम्हाला वाटते का? तुमचा पार्टनर (Partner)आता तुमची काळजी करत नाही असे तुम्हाला वाटते का? जर या तीन प्रश्नांची उत्तरे हो असतील तर समजून घ्या की तुमचे नाते आता तुटण्याच्या मार्गावर आहे. जर तुम्ही नातेसंबंधांच्या या वाईट टप्प्यातून जात असाल, तर तुमच्या स्वभावातील काही दोष/त्रूटी बाजूला करणं गरजेच आहे. नातं टिकण्यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न

जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जी त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला आनंद देऊ शकेल. तुम्ही रात्रंदिवस जरी यासाठी प्रयत्न केलात तरी ते शक्य नाही.याउलट याचा तुम्हालाच मानसिक त्रास होऊ लागेल. प्रत्येकाला खूश करण्याच्या आग्रहामुळे तुमचे स्वतःचे नाते बिघडू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या.

टाळण्याची सवय

तणावाच्या भीतीने जे काम पटकन होणार असते त्याला बरेच लोक टाळतात किंवा लांबणीवर टाकतात. काहीवेळा यामुळे दोघांच्यामधील अंतर वाढवण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला असं जाणवत असेल तर समस्या टाळण्याऐवजी ती हाताळायला शिका. एखादी वैयक्तिक समस्या असेल तर ती सोडवायलाही उशीर करू नका. बऱ्याचदा उशीर केल्याने गोष्टी हाताबाहेर जातात. आणि नंतर कितीही प्रयत्न केला तर मार्ग निघू शकत नाही.

नकारात्मक वृत्ती

बरेच लोक नेहमीच नकारात्मक विचार करत असतात. अशा लोकांच्या सानिध्यात राहिल्याने आपणही नकारात्मक विचार विचार करायला लागतो. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. जीवनाला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला शिका. येणारे संकट किंवा वाईट कोणतीही गोष्ट स्वीकारायला शिका. यातून वाद-विवाद कमी होतील आणि नात्यात विश्वास वाढेल.

इतरांमध्ये आनंद शोधणे

जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंद शोधण्याऐवजी इतरांच्या जीवनात आनंद शोधत राहिलात, तर तुम्ही जगातील सर्वात दुःखी लोकांपैकी एक होऊन बसाल. तुमचा आनंद तुम्ही बाहेर नाही, तर तुमच्यात शोधला पाहिजे. तुमच्या जीवनातील छोट्या- छोट्या क्षणांचा आनंद घ्या आणि त्याला सेलिब्रेट करा.

जीवनाला शाप देणे

जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावे लागते. जो माणूस या समस्यांमध्ये, अडचणीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तो आनंदी जीवन जगण्यात यशस्वी होतो. अडचणीच्या प्रत्येकवेळी कुडत न बसता यातून बाहेर निघायला शिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT