Relationship Tips  esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips :  लग्नाआधीच बदला या सवयी, वैवाहीक जीवनाचा प्रवास होईल सुखकर

लग्न ठरल्यापासूनच स्वत:च्या स्वभावात करा हे बदल,

Pooja Karande-Kadam

Relationship Tips :  

पती-पत्नीचे नाते खूप नाजूक असते. काही लग्न ५० वर्ष टिकतात तर काही दोन महिनेही टिकू शकत नाहीत. नवरा-बायकोमध्ये किती समजूतदारपणा आहे, यावर लग्न किती टिकेल यांचा अंदाज बांधला जातो.

नातं दोघांच असतं त्यामुळे दोघांनीही लग्नानंतर स्वत:ला बदलणं गरजेच आहे. पती-पत्नीमधील एक छोटीशी चूक नाते बिघडू शकते. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर काही गोष्टी बदलणे अवघड जाऊ शकते. म्हणूनच लग्नाआधीच काही सवयी बदलण्याचे ठरवले. तर ते फायद्याचे ठरू शकते.

कारण, लग्न होणार आहे झाल्यावर बघू, बदल करू असे म्हणणारे लोक कधीच बदलत नाहीत. आणि त्यांच्या काही सवयींचा प्रभाव जोडीदारावर पडतो, मग सुरू होतात वाद आणि त्याचा शेवट हा नातं संपवूनच होतो.  

लग्नानंतर लगेच या वाईट सवयी सोडा

  • संशय घेऊ नका

  • एकमेकांचा आदर करा

  • मित्रांना कमी वेळ द्यायला लागा

  • सतत चिडचिड करू नका

  • निर्णय घेताना जोडीदाराशी चर्चा करा

संशय घेऊ नका

अनेकदा असे दिसून येते की लोक आपल्या पार्टनरवर संशय घेतात. पण संबंध बिघडण्यामागे संशय हे सर्वात मोठे कारण आहे. लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांवर संशय घेत असतील तर ही सवय सोडा. अशा परिस्थितीत नाते तुटू शकते. तुम्हालाही संशय घेण्याची सवय असेल तर ती बदला.

एकमेकांचा आदर करा

एकमेकांवर प्रेम करण्यासोबतच नात्यातही एकमेकांचा आदर केला पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांचा आदर केला नाही तर नाते तुटू शकते. अनेकांना आपल्या जोडीदाराला समजून न घेण्याची आणि त्याचा आदर न करण्याची सवय असते. ही सवय सुधारली पाहिजे.

मित्रांना कमी वेळ द्यायला लागा

लग्नानंतर पती-पत्नी दोघांनीही घराबाहेर कमी वेळ घालवला पाहिजे. पती-पत्नी दोघांनीही आपल्या सहकारी आणि मित्रांसोबत मर्यादित वेळ घालवला पाहिजे. एकमेकांना शक्य तितका वेळ द्या. वीकेंडला मित्रांसोबत जाण्याऐवजी जोडीदारासोबत हँग आउट करण्याचा प्लॅन बनवा. मित्रांसोबत जास्त वेळ घालवला तर नातं कमकुवत होऊ शकतं.

स्वभावात बदल करा

छोट्या-छोट्या गोष्टींवरून जोडीदारावर रागावणे देखील चुकीचे आहे. यामुळे संबंध बिघडू शकतात. अशा परिस्थितीत विनाकारण राग येणे टाळावे.

निर्णय घेताना जोडीदाराशी चर्चा करा

लग्नानंतर पती-पत्नीने एकमेकांपासून गुप्तपणे कोणताही निर्णय घेऊ नये. याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो. आयुष्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराशी नक्कीच बोला. त्यामुळे नाते आणखी घट्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT