Relationship Tips
Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : लग्नाआधी पार्टनरला विचारा या 5 गोष्टी, अनुष्का अन् विराटसारखं बहरेल नातं

सकाळ ऑनलाईन टीम

Relationship Tips : नात्यात विश्वासाबरोबरच तुम्हाला नात्याबाबत काय वाटतं तेही महत्वाचं ठरतं. तेव्हा लग्नाआधीच तुमच्या पार्टनरला या काही गोष्टी विचारणे कधीही आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी अडचणी येणार नाहीत. तेव्हा तुम्ही विराट आणि अनुष्काच्या लग्नातून ही काही प्रश्न विचारत प्रेरणा घेऊ शकता.

अनुष्का आणि विराटचं लव्ह मॅऱेज आहे हे प्रत्येकालाच माहितीये मात्र त्यांनी लग्नाच्या आधी या काही प्रश्नांवर चर्चा केली आणि मगच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

धार्मिक विधीबाबत चर्चा

तुमचं लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो वर वधूच्या कुटुंबियांमध्ये लग्नाच्या विधींमध्ये विविधता असेल तर वाद होण्याची शक्यता असते. तेव्हा लग्नाच्या विधींवर लग्नाआधीच वर वधूंनी सविस्तर चर्चा करावी.

फॅमिली प्लानींग

वर वधूची या विषयावर वयक्तिक चर्चा व्हायलाच हवी. कारण बरेचदा लग्नानंतर बाळ लवकर हवं अशी कुटुंबियांची घाई चाललेली असते. मात्र वर वधूची यावर आधीच चर्चा झालेली असेल तर तुम्ही ठामपणे तुमचा निर्णय कुटुंबियांना सांगू शकता.

नोकरी आणि वेळ

जोडप्यांनी त्यांच्या व्यवसाय किंवा नोकरी आणि त्यांच्या वेळेसंबंधी सुद्धा एकमेकांशी (Partner) चर्चा केली पाहिजे. कारण बरेचदा तुमच्या कामाच्या वेळेवरून तुमचे एकमेकांशी वाद होऊ शकतात. त्यामुळे आधी चर्चा झाली असेल तर तुम्हाला एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल.

नात्यात या गोष्टी आधी माहिती असणे किंवा यावर आधी चर्चा होणे यासाठी आवश्यक असते की जेणेकरून लग्ननंतर तुम्हाला ऐकमेकांबाबात तक्रारी नसणार. आधीच सगळ्या विषयांवर चर्चा झाली असल्याने तुमचा ऐकमेकांबाबत समजूतदारपणा वाढतो.

नात्यात असा टीकवा विश्वास

  • नात्यात विश्वास टिकवायचा असेल तर कुठलीही परिस्थिती असली तर खोटे बोलणे टाळले पाहिजे.

  • नात्यात मित्राप्रमाणे एकमेकांना समजून घ्यावे.

  • एकमेकांना पुरेसा वेळ द्यावा. (Relationship Tips)

  • भांडण झाले तरी ज्याची चूक असेल त्याने माफी मागून विषय मिटवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT