Relationship Tips: Sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: हेल्दी रिलेशनसाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नात्यात वाढेल प्रेम

Relationship Tips: नात्यात कधी गैरसमज निर्माण झाल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो.

Puja Bonkile

relationship tips how to save your relationship

नात्यात सुरूवातील सर्व गोष्टी चांगल्या असतात. एकमेकांसोबत बराच वेळ गालवतात. त्यांच्याकडे पाहून कधी नात्यात कटूता येईल असे वाटत नाही. पण नात्यात कधी गैरसमज निर्माण झाल्यास अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. जर नात्यातील गैरसमज दूर झाले नाही तर नातं तुटण्यास वेळ लागत नाही. कोणतेही नातं अचानक तुटत नाही. पण पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास नात्यात प्रेम वाढू शकते.

  • जोडीदाराला वेळ द्या

तुम्हाला तुमचं नातं आनंदी आणि निरोगी ठेवायचे असेल तर जोडीदाराला त्याची स्पेस द्या. जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करू नका. जर तुम्ही जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप किंवा जास्त काळजी करू लागला तर तुमच्या नात्यात कटूता येऊ शकते. यामुळे वेळीच सावध व्हा आणि जोडीदाराला त्याची स्पेस द्यायला सुरूवात करा.

  • जोडीदाराची स्थिती

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेऊ शकत नसाल तर तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते. जोडीदाराच्या विचारांचा आदर केल्यास नातं अधिक घट्ट होण्यास मदत मिळते. जर तुम्ही असे करत नसाल तर तुमची सवय बदला अन्यथा तुमचे नातं तुटू शकते.

  • साथ देणे

नातं टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांना प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी. जर तुमचा जोडीदार वाईट परिस्थितीतून जात असेल तर त्याला मदत करा. यामुळे नात्यात आपुलकी नक्की वाढेल.

  • सुसंवाद

जर तुमच्या नात्यात सुसंवाद नसेल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच भावनिक अंतर निर्माण होऊ शकते.यामुळे जोडीदाराशी संवाद साधला पाहिजे. एकमेकांशा सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजे. जर तुम्ही जोडीदारापासून गोष्टी लपवत असाल तर असे करणे नात्यासाठी चांगले नाही.

  • स्वार्थी नसणे

कोणत्याही नात्यासाठी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे स्वार्थी असणे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणि त्याच्या ध्येयांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या आवडीनिवडींना जास्त महत्त्व देत असाल तर तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते. यामुळे एकमकांच्या निर्णयांचा आदर करा.

  • मत्सर

मत्सर हे देखील नातं तुटण्याचे प्रमुख कारण असू शकते. तुमच्या जोडीदाराच्या यशाबद्दल ऐकून तुम्ही अस्वस्थ होत असाल तर तुमचे नातं जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. यामुळे जोडीदाराने कोणत्याही कामात यश मिळवले तर त्याचे कौतुक करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT