Relationship  Sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: नातं कंटाळवाणे वाटत असेल तर फॉलो करा 'या' रोमँटिक टिप्स

Relationship Tips: नवरा -बायको दोघेही नोकरी करत असल्याने एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. यामुळे नातं कंटाळवाणे होते.

पुजा बोनकिले

Relationship Tips: लग्नानंतर काही वर्षांनी लोकांच्या नात्यात कटूता येते आणि मग कंटाळवाणे वाटू लागते. अशावेळी अनेक जोडपी नाराज राहतात आणि कंटाळवाणेपणावर मात करण्यासाठी अनेक उपाय शोधतात.

तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या नात्यातील कंटाळा कसा दूर करू शकता हे जाणून घेऊया.

आनंदी क्षण आठवा

आजकालच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नात्यात आणि वैवाहिक जीवनावर विपरित परिणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी सर्वात आधी तुम्ही जोडीदारसोबत शेअर केलेले रोमँटिक आणि आनंदी क्षण आठवू शकता. तुमच्या जोडीदारासोबत शांत ठिकाणी बसा आणि तुमची पहिली भेट, रोमँटिक डेट आणि तुम्ही एकत्र घालवलेला प्रत्येक क्षणबद्दल बोलावे.

जुने फोटो पहा

नात कंटाळवाणे न होण्यासाठी तुम्ही तुमचे काही जुने फोटो पाहू शकता. जे तुम्ही पहिल्या भेटीत काढले होते. यामुळं तुमचं नातं कंटाळवाणे होणार नाही आणि तुमच्यात प्रेम कायम राहील. तुम्ही दोघेही मित्रांप्रमाणे विनोद करू शकता आणि मजा करू शकता. हसण्याने माणसाचे मन नेहमी ताजेतवाने राहते आणि त्यामुळे नातं घट्ट राहते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही गेम देखील खेळू शकता.

रोमँटिक चित्रपट पाहा

तुम्हा दोघांना शनिवार किंवा रविवारी सुट्टी असेल तर कॉमेडी किंवा रोमँटिक चित्रपट पाहू शकता. यामुळे दोघांमधील प्रेम टिकून राहते आणि नात्यातील कंटाळा कमी होतो. तुम्ही एकमेकांना टिफिन पॅक करत असाल तर रोमँटिक नोट लिहू शकता.

सोबत वेळ घालवा

सकाळी धावपलीमुळे सोबत जेवण करू शकत नसाल तर संध्याकाळी सोबत जेवण करावे. तसेच जेवणानंतर एकत्र फिरायला जावे. यामुळे मनं प्रसन्न राहते आणि नात्यातील गोडवा वाढतो.

लाँग ड्राइव्ह

दोघांनी लाँग ड्राइव्हवर जाण्याचा प्लॅन करावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सायकलने, दुचाकीने किंवा कारनेही जाऊ शकता. जेव्हा तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाता तेव्हा या छोट्या राईडमध्ये तुम्हाला मिळणारी मजा तुम्हाला नेहमीच फ्रेश ठेवते आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नातं होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT