relationship esakal
लाइफस्टाइल

इगोमुळे वैवाहिक जीवनात कलह? 'या' पद्धतीने ठेवा दूर

अनेकांना स्वाभिमान आणि अहंकार यातला फरक समजत नाही.

शर्वरी जोशी

कोणत्याही नात्यात अहंकार म्हणजे इगो आला की ते नातं तुटायला फार काळ लागत नाही. म्हणूनच सध्याच्या काळात ''पटत नाही'' अशी कारण देऊन अनेक जोडपी विभक्त होत आहेत. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर अनेकांना स्वाभिमान आणि अहंकार यातला फरक समजत नाही. त्यामुळे अनेक जण अहंकारालाच स्वाभिमान समजण्याची गल्लत करतात. त्यातूनच मग पुढे कलह होण्यास सुरुवात होते. म्हणूनच, नात्यात इगो आड येत असेल तर तो कशाप्रकारे दूर करावा याच्या काही टीप्स जाणून घेऊयात. (relationship-tips-planning-on-avoided-ego-clashes-in-your-marriage-ssj93)

१. स्वत:वर गर्व करु नका -

अनेकदा पार्टनरपेक्षा करिअरमध्ये जास्त यश मिळत असेल किंवा अन्य काही परिस्थितींमध्ये व्यक्ती सरस असेल तर ती स्वत:वर गर्व करु लागते. यातूनच मग सतत पार्टनरचा अपमान करणं,त्याला कमीपणा दाखवणं वा सतत टोचून बोलणं असे प्रकार घडू लागतात. परिणामी, पार्टनर अशा व्यक्तीला कंटाळतो व विभक्त होण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे कधीही स्वत:वर गर्व करु नका. मुळात नात्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा वादच नसतो.

२. सतत स्वत:चं कौतुक -

अनेकांना केवळ स्वत:चं कौतुक करायला आवडतं. त्यामुळे ते स्वत:ला जास्त महत्त्व देतात. इतकंच नाही तर आपण कसं ग्रेट आहोत हे सतत पार्टनरला सांगायचा प्रयत्न करतात. त्यामुळे पार्टनर तुम्हाला कंटाळू शकतो. म्हणूनच, स्वत:चं कौतुक करण्याची पण एक मर्यादा ठेवा. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केली तर त्यामुळे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता असते.

३. पार्टनरला कमीपणा दाखवू नका -

जर तुम्हाला आनंदी आणि सुखी कुटुंब हवं असेल तर पार्टनरला कधीच कमीपणा दाखवू नका. त्याच्या कोणत्याही निर्णयावर हसण्यापेक्षा किंवा खिल्ली उडवण्यापेक्षा त्याची साथ द्या. तसंच वारंवार त्याचा अपमान करु नका.

४. पार्टनरचंदेखील कौतुक करा -

ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचं कौतुक झालेलं आवडतं. तसंच कधी तरी जोडीदाराचंदेखील कौतुक करा.प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत त्याचं कौतुक करा. त्याला सपोर्ट करा. यामुळे नात्यातील प्रेम वाढायला नक्कीच वाव मिळेल.

५. एकमेकांना वेळ द्या -

कोणत्याही नात्यात प्रेम वाढवायचं असेल तर त्या नात्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर एकमेकांना वेळ द्या. एकमेकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT