लाइफस्टाइल

'या' टीप्स करा फॉलो; होणार नाही Dating Platform वर रिजेक्ट

ऑनलाइन डेटिंग करताना रिजेक्ट होताय?;

शर्वरी जोशी

एकेकाळी घरातील ज्येष्ठांच्या पुढाकाराने मुलांची लग्न जुळवली जात होती. मात्र, बदलत्या काळानुसार लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत बदल झाला आहे. आता शक्यतो मुलं ऑनलाइन डेटींगच्या online Dating माध्यमातून आपला जोडीदार निवडत आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात ऑनलाइन डेटींग प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक जण ऑनलाइन डेटींग अँपच्या माध्यमातून नव्या लोकांशी ओळखी करत असतात. मात्र, लग्नाचा विषय आला की काहींना रिजेक्ट केलं जातं. म्हणजे थोडक्यात, लग्नासाठी नकार दिला जातो. पण मग हा नकार नेमका कोणत्या कारणामुळे दिला असेल हा प्रश्न अनेकांना सतावतो. म्हणूनच, ऑनलाइन डेटींग करताना तुम्हाला रिजेक्शन मिळू नये यासाठी नेमकं काय करावं ते पाहुयात. (relationship-tips-reasons-you-get-rejected-on-dating-platforms)

१. प्रोफाइल फोटोची निवड -

अनेक जण प्रोफाइल फोटो ठेवताना शक्यतो स्वत:चा सिंगल फोटो ठेवतात. परंतु, दरवेळी तुमचा सिंगल फोटो पाहून कोणीतरी तुम्हाला डेट करायला येईल असं वाटत असेल तर तो विचार डोक्यातून काढून टाका. अनेक जणांना फोटोवरुन एखाद्या व्यक्तीला जज करण्याची सवय असते. त्यामुळे शक्यतो सिंगल फोटो न ठेवतात. वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो कोलाज करुन ठेवा. तसंच शक्य असल्यास वरचेवर फोटो चेंज करत रहा.

२. चेहऱ्यावर हसू नसणे -

अनेक जण फोटो काढताना गंभीर चेहरा करुन उभे राहतात. परंतु, अशा सवयीचा परिणाम तुमच्या प्रोफाईलवर होत असतो. एकतर तुम्ही अनरोमॅण्टिक, उदास किंवा अॅटिट्युड असलेली व्यक्ती आहात असा समोरच्या व्यक्तीचा समज होतो. परिणामी, कोणीही तुमच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे कायम हसतमुख असलेला फोटोच प्रोफाईलवर असावा.

३. चेहऱ्यात साम्य असणं -

अनेकदा दोन व्यक्तींच्या चेहऱ्यात किंवा वागण्याबोलण्यात बरंचसं साम्य असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला तुमचा चेहरा त्यांच्या एक्ससारखा किंवा अनोळखी व्यक्तीसारखा वाटत असेल तर ते तुम्हाला रिजेक्ट करु शकतात. परंतु, यात तुमचा काहीच दोष नसतो. त्यांमुळे अशी व्यक्तीला डेट न केलेलंच बरं.

४. बायो अपडेट नसणे -

अनेक जण प्रोफाईलमध्ये किंवा बायोडाटामध्ये स्वत: विषयी योग्य किंवा व्यवस्थित माहिती लिहित नाहीत. तसंच अनेकदा काही तरी लिहायचं म्हणून काहीही लिहितात. परंतु, जर तुमचा बायो नीट नसेल तर कोणीही तुमचं प्रोफाईल चेक करणार नाही. त्यामुळे बायो कधीही अपडेट आणि व्यवस्थितच असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT