Relationship Tips  esakal
लाइफस्टाइल

Valentines Day 2024: जोडीदार सतत करतोय अपमान तर करा या गोष्टी, नातं सुधारण्यासाठी मदत होईल

एक चांगला जोडीदार आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचा आदर करतो

Pooja Karande-Kadam

Valentines Day 2024:

एकमेकांचा आदर हा कोणत्याही नात्यातील ताकदीचा आधार असतो. जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो तेव्हाच आपण आपल्या नातेसंबंधात इतरांसाठी आदर्श जोडपं होऊ शकतो. नवरा-बायकोच्या नात्मयाध्ये एकवेळ प्रेम कमी असले तरी चालेल पण आदर आणि सन्मान असणे जास्त महत्त्वाचे आहे.

एक चांगला जोडीदार आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचा आदर करतो. प्रेम ही एक विशेष भावना आहे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की प्रेम कोणत्याही गोष्टीपेक्षा मजबूत आहे. ते जर सोबत असेल तर आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद मिळते.  

कधीकधी असं वाटू लागतं की आपला जोडीदार चारचौघात, कुटुंबातील सदस्यांसमोर आपल्याला वाटेल तसे बोलतो. तो तुमचा आदर करत नाही. एखादा किरकोळ गोष्टीवरून झालेला वादही झाला तरी जोडीदाराचा पाणउतारा करतो. अशावेळी नातं नकोसं वाटायला लागतं. आणि तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. तर तुमचा जोडीदार असाच असेल तर काय करावं हे पाहुयात.

आत्मसन्मानासाठी बोलते व्हा

प्रेम टिकवण्यासाठी आपुलकी आणि कौतुक या दोन प्रमुख गोष्टी आहेत. नात्यात संतुलन राखण्यासाठी नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे, पण हे प्रेम मोकळं असावं आणि कोणत्याही अटीवर आधारित नसावं. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वाईट वागणुकीला नेहमीच सामोरे जावे लागत असेल तर हे नाते हळूहळू तुमचाही नाश करेल. तुमच्या आत्मसन्मानासाठी बोला आणि तुमच्या जोडीदाराला कोणत्या प्रकारचे बदल हवे आहेत ते सांगा.

मर्यादा ठरवा

चांगल्या नात्यासाठी काही मर्यादा दोघांनीही घालून घेणे गरजेचे आहे. एकमेकांना नेहमी समजून घेतले पाहिजे. एखाद्याशी जोडीदाराबद्दल बोलताना कोणत्या पातळीपर्यंत बोलावे, याचे लिमिट्स असणे गरजेचे आहे.

समजून घेणं

जर एका जोडीदाराला दिवसभर काही काम करायचे असेल. दुसऱ्या जोडीदाराला खरेदीला जायचे असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे. जर तुम्ही नात्यात काही मर्यादा पाळल्या तर तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.

स्वत:ला आदर द्या 

तुम्ही स्वतःचा आदर केलात तर इतर तुमचा आदर करतील.नात्यांमध्ये आदर असणे खूप गरजेचे आहे. तुमचे नाते केवळ आदरानेच पुढे जाते. इतरांकडून आदराची अपेक्षा करण्याआधी तुम्ही नात्याचा आदर केला पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आदरही मिळेल.

जोडीदाराच्या अपेक्षा समजून घ्या

कधी कधी जोडीदाराच्या अपेक्षा, त्याला तुम्ही केलेल्या अपमानामुळे आलेला राग या गोष्टी तुमच्याकडून दुर्लक्षित होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा अपमान केलाय तर त्यांची माफीही मागा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT