summer session couple trip spot in india 
लाइफस्टाइल

पहिल्यांदाच डेटवर जाणाऱ्या मुलींनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी

पहिल्या भेटीत इंप्रेशन खराब पडू नये यासाठी घ्या 'ही' काळजी

शर्वरी जोशी

पहिल्यांदाच डेटवर first date जाताना प्रत्येकाच्याच मनात कुतूहल, उत्सुकता आणि आनंद अशा अनेक भावना एकवटलेल्या असतात. त्यामुळे पहिली डेट ही मुलगा किंवा मुलगी या दोघांसाठीही तितकीच खास असते. म्हणूनच, ही पहिली भेट कायम स्मरणात रहावी यासाठी कपल्स प्रयत्नशील असतात. तसंच, या पहिल्या भेटीत आपलं इंप्रेशन खराब पडू नये यासाठी सुद्धा मुली खूप काळजी घेतात. परंतु, अनेकदा आपल्या नकळतपणे आपल्याकडून काही चुका होतात. म्हणूनच, पहिल्यांदाच डेटवर जाताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहुयात. (relationship-tips-things-women-should-avoid-on-a-first-date-ssj93)

१. उशीर करु नका -

मुलींनी डेटवर उशीरा जाणं ही एकेकाळी फॅशन झाली होती. मुलगा प्रथम येऊन मुलीची वाट पाहतोय आणि मुलगी मस्त आवरुन सावरुन उशीरा येतीये. त्यावेळी तिचं पडणारं इंप्रेशन अनेक मुलांना आवडायचं. परंतु, आता काळ बदलला आहे. प्रत्येक जण घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असतो. त्यामुळे जर तुम्ही जुन्या स्टाइलप्रमाणे उशीरा गेलात तर तुमचं पहिलंच इंप्रेशन वाईट पडू शकतं. त्यामुळे डेटवर कायम वेळातच जा.

२. सतत फोनकडे लक्ष नको -

डेटवर गेल्यानंतर फोन काही काळासाठी स्वत: पासून दूर ठेवा. तुमच्या समोर बसलेला पार्टनरसोबत वेळ घालवा. एकमेकांचे विचार जाणून घ्या. आवडीनिवडींविषयी चर्चा करा. त्यामुळेच तुमचे विचार किती जुळतात याचा अंदाज लावता येऊ शकतो. परंतु, तुम्ही पार्टनर समोर असताना सुद्धा सतत फोनमध्ये पाहात असाल तर तुमच्या बद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो. तुम्हाला डेटमध्ये इंटरेस्ट नाही किंवा तुमच्या मनात अन्य व्यक्ती आहे असा पार्टनरचा समज होऊ शकतो.

३. स्वत:बद्दल कमी बोला -

अनेकजणी डेटवर गेल्यानंतर केवळ स्वत: बद्दलच बोलत बसतात.परंतु, स्वत: बद्दल बोलत असताना समोरच्या व्यक्तीचं म्हणणंदेखील ऐकून घ्या. तरच तुमचं रिलेशन चांगलं जुळू शकतं.

४. एक्सविषयी बोलू नका -

भविष्याचा विचार करुन तुम्ही डेटवर जात असता. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होतील असं वागू नका. यात सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या एक्स बॉयफ्रेंड किंवा भूतकाळाविषयी लगेच बोलू नका. डेटनंतर तुमच्यात चांगली मैत्री निर्माण होऊ दे. या मैत्रीच्या काळात तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल बोलू शकता. परंतु, पहिल्याच भेटीत थेट एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT