Relationship Tips  esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : खरं प्रेम दिवा घेऊन शोधलतं तरी सापडणार नाही? असं तुम्हालाही वाटत असेल, तर या टिप्स आजमावून पहाच

आता तुम्हाला नक्की मिळणार खरं प्रेम, कसं ते पहा

Pooja Karande-Kadam

Relationship Tips : गल्लीतलं पम्या आज जरा सॅडच होतं. काय तर म्हणे त्याची सहावी गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली. तसा याआधी झालेल्या ब्रेकअपमध्ये पम्या सिरिअस नव्हता. पण या शेवटच्या पोरीने दिलेल्या डच्च्यू त्याच्या भलताच जिव्हारी लागला होता.

या मुलीबाबत तो सिरिअस होता, लग्न, पोरांची नावं देखील त्यांने ठरवलेली. पण, त्या मुलीला तिचा श्रीमंत एक्स पुन्हा भेटला आणि ती पम्याला सोडून गेली. आता पम्या ग्रूपमध्ये जास्त मिक्स होत नाही, तो शांतच असतो.

जेव्हा कधी प्रेमाचा विषय निघतो तेव्हा प्रेम बिन काय नसतं, सगळं खोटं असतं, जगात खरं प्रेम नाहीय. असंच तो म्हणतो, आता या पम्याला तर आपण समजावू शकत नाही. पण तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल तर काय करायचं ते आम्ही सांगतो. ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील खरं प्रेम मिळेल.

सध्याच्या युगात स्वार्थी लोकांची संख्या वाढली असताना खरे प्रेम शोधण्याचे मार्गही पूर्वीपेक्षा चांगले झाले आहेत. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कोणाचे खरे प्रेम शोधायचे असेल तर ते शोधण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे बदल स्वत:मध्ये करावे लागतील. ते कोणते हे पाहुयात.

स्वतःला थोडे आकर्षक बनवा

एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ती व्यक्ती तुमच्यावर इंप्रेस व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही स्वतःला थोडेसे आकर्षक बनवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, परंतु जेव्हा तुम्ही स्वतःला थोडेसे आकर्षक बनवता.

तेव्हा तुमचे खरे प्रेम शोधणे तुमच्यासाठी खूप सोपे होते. यामुळे अधिक लोकांना तुम्हाला भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःसाठी खरा जोडीदार शोधू शकाल. (Relationship Tips)

तुमची ओळख वाढवा

जेव्हा तुम्ही सतत नवीन लोकांना भेटता तेव्हा तुम्हाला तुमचे खरे प्रेम भेटण्याची संधी मिळते. म्हणून, आपण आपले वर्तुळ थोडे विस्तारित करणे, आणि थोडे स्वभाव मनमोकळा करणे खूप महत्वाचे आहे.

यासाठी तुम्ही मित्रांच्या ग्रूपची मदत घेऊ शकता. तसेच, तुमच्या कंपनीने आयोजित केलेल्या पार्ट्यांना उपस्थित राहा. शक्य तितक्या आपल्या मित्रांसह बाहेर जा. क्लब आणि संस्थांमध्ये देखील सामील व्हा. यामुळे तुम्हाला योग्य व्यक्ती शोधणे सोपे जाईल.

विचारांना पॉलिश करावं लागेल

जर तुम्हाला खरोखरच तुमच्यासाठी परफेक्ट असलेल्या व्यक्तीला भेटायचे असेल. तुम्ही त्याच्यासोबत आयुष्यभर आनंदी राहाल असे वाटत असेल तर आधी तुम्हाला तुमच्या मनातील काही जून्या विचारांना सोडावे लागेल. आपण सर्वजण लहानपणापासून अनेक प्रकारचे रोमँटिक चित्रपट आणि पुस्तके वाचत मोठे झालो आहोत, ते पाहून आपल्या मनात प्रेमाविषयीची धारणा तयार होते.

पण खऱ्या आयुष्यात खरे प्रेम प्रत्येक वेळी होत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची इमेज आधीच मनात बनवू नका. यामुळे, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला त्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न कराल आणि मग तुम्हाला तुमचे खरे प्रेम भेटू शकणार नाही. (Love Marriage)

खऱ्या प्रेमाला अटी नसतात

खरे प्रेम बिनशर्त असते. याचा अर्थ असा की खरे प्रेम तुम्ही कसे दिसते, तो किंवा ती कशी दिसते, यावर अवलंबून नाही. तर ते केवळ चांगल्या मनावर अवलंबून असते. म्हणून, केवळ चांगल्या दिसण्यातच खरे प्रेम शोधू नका.

त्याऐवजी, ज्याच्यासोबत तुम्ही आरामदायी आणि सुरक्षित जीवन व्यतीत करू शकता.अशा व्यक्तीला शोधा. जी तुमच्यासाठी स्वत:ला बदलेल, तुमच्या सुखासाठी सर्वकाही करायला तयार असेल. तेच असेल तुमचं खरं प्रेम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT