love
love e sakal
लाइफस्टाइल

तुम्ही लव अ‍ॅडिक्टेड तर नाहीये ना?

शर्वरी जोशी

कोणतीही गोष्ट प्रमाणात असली की ती फायद्याची असते. मात्र, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर तीच गोष्ट स्वत: सह इतरांसाठीही त्रासदायक ठरते. अनेकांना काही ठराविक गोष्टींचं व्यसन असतं. काहींना अभ्यास करायची, काहींना गप्पा मारायचं किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन करण्याचं. थोडक्यात कोणतं ना कोणतं व्यसन हे प्रत्येकालाच असतं. परंतु, सध्याच्या तरुण पिढीमध्ये प्रेमाचं व्यसन जडल्याचं पाहायला मिळत आहे. हो. प्रेमाचं व्यसन. अनेकांना या मागाच अर्थ उलगडला नसेल. पण, सध्याच्या काळात अनेक तरुण लव अ‍ॅडिक्टेड झाले आहेत. म्हणूनच, हे लव अ‍ॅडिक्शन नेमकं काय आहे ते पाहुयात. (relationships are you a love addict)

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडावं. ती भावना अनुभवावी असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रेमात पडणं वाईट नाही. परंतु, या प्रेमाचा अतिरेक होणार नाही किंवा तुम्ही त्याच्या आहारी जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सध्या अनेक जण लव अ‍ॅडिक्टेड झाले असून याविषयी २०१० मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च करण्यात आला होता.

प्रेमात पडल्यानंतर अनेकांच्या स्वभावात, त्यांच्या वागण्याबोलण्यात बदल होतो. पोटात अनेक फुलपाखरं उडून गोंधळ घालतायेत असं वाटतं. आपली आवडणारी व्यक्ती आपल्या समोर आली की गोंधळून जायला होतं. त्या व्यक्तीला पाहिल्यावर एक प्रकारचं वेगळंच पण आनंददायी फिलिंग येतं. परंतु लव अ‍ॅडिक्टेड झाल्यावर या फिलिंग्स थोड्या वेगळ्या स्वरुपाच्या असतात. परिणामी, या अ‍ॅडिक्शनचा व्यक्तीवर विपरित परिणाम होतो.

प्रेमाचा विपरित परिणाम-

अनेक जण प्रेमात पडल्यानंतर पूर्णपणे पार्टनरवर अवलंबून राहतात. या पार्टनर पलिकडे दुसरं जग आहे, आपल्याला समजून घेणारी माणसं आहेत याचा त्यांना विसर पडतो. त्यामुळे अनेकदा नात्यात दुरावा आला किंवा मतभेद झाले तरीदेखील लव अ‍ॅडिक्टेड व्यक्ती पार्टनरला सोडत नाहीत. पार्टनर देत असलेला सगळा त्रास ते सहन करतात. पार्टनरने आपल्याला सोडलं तर आपण एकटे पडून आपल्याला बाहेरच्या जगात कोणीच मित्र किंवा प्रेम करणारी व्यक्ती राहणार नाही असं त्यांना वाटतं.

मानसिकतेवर होतो परिणाम -

लव अ‍ॅडिक्टेड व्यक्तीचा काही कारणास्वत ब्रेकअप झाला तर अशा व्यक्ती लगेच घाबरुन जाता. सतत भीती वाटणे, अस्वस्थ होणे अशा समस्या त्यांच्यात निर्माण होतात. साधारणपणे ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं सायकॉलॉजिस्ट रचना के सिंह यांनी सांगितलं. अनेक तरुण ब्रेकअप झाल्यानंतर स्वत:ला सावरु शकत नाही. त्यामुळे अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर या व्यक्ती पुन्हा नव्या प्रेमात पडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

SCROLL FOR NEXT