relationship tips Esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: पार्टनरसोबत भांडताना चिडण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारा

मानसिक आरोग्यासाठी राग ही अत्यंत घातक बाब मानली जाते.

सकाळ डिजिटल टीम

नाते कोणतेही असो आपण कधी ना कधी भावनिकरित्या दुखावतो. त्यावेळी आपले रागावर कंट्रोल राहत नाही. आणि आपण भांडणात एक्स्प्रेस सुटतो. स्वतःवर केलेल्या आरोपांचा किंवा प्रश्नांचा विचार न करता वाद घालू लागतो. अनेक वेळा तुम्ही स्वत:ला 'वॉर मोड' (War Mode) मध्ये आणता. त्यामुळे तणाव आणखी वाढतो आणि त्याचा परिणाम नात्यावर होऊ लागतो.

मानसिक आरोग्यासाठी राग ही अत्यंत घातक बाब मानली जाते. रागीट स्वभाव हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते. अशा स्वभावामुळे हृदयविकाराची शक्यता ३ टक्क्यांनी वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर ही शक्यता 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. तरुणपणी ही प्रवृत्ती जास्त धोकादायक ठरू शकते. कारण या अवस्थेत ही प्रवृत्ती आपल्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम घडवते.

भांडताना किंवा वाद सुरू असताना तेव्हा लोकांना उत्तर देण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारा, असा सल्ला सायकॉलॉजिकल काऊंसलर (psychological counsellor) ल्युसिल शेकलटन यांनी दिला आहे.

प्रत्युत्तर देण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारा

भावना ओळखा : जेव्हा तुम्ही नाराज असाल तेव्हा प्रथम स्वतःला विचारा की, तुमची नाराजी नेमकी कोणत्या गोष्टीवरून आहे. तसेच या भावना नक्की काय आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करा.

कारण जाणून घ्या

तुम्हाला वाद घालण्यासाठी नक्की कोणती गोष्ट कारणीभूत ठरते हे ओळखा. कोणत्या गोष्टीमूळे तुम्हाला भांडावसे वाटते, हे तुम्हाला माहीत असेल. तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

● स्वतःच्या रिऍक्शनवरचा विचार करा.

तुम्ही खूप चिडलेले असता तेव्हा तुम्ही कसे रिऍक्ट होता. हे स्वतःला विचारा. तुमच्या अशा रिऍक्शनचा नात्यावर काय परिणाम होतो याचाही विचार करा. चिडून, भांडून काही फायदा किंवा तोटा होणार आहे का?, याचाही विचार करा.

● परिणामाचा विचार करा.

तुम्ही कोणाच्या प्रश्नावर कशाप्रकारे प्रतिसाद देता. त्यावेळी तुमची शारिरीक हालचाल,बोलण्याची पद्धत, हावभाव कसे आहेत, याचा विचार करा. तुमच्या या प्रतिक्रियेचा नात्यावर काय परिणाम होईल, हा विचारही करा.

● आत्मपरीक्षण करा.

तूम्ही भांडल्यानंतर ज्या प्रतिक्रीया देता, त्यांचा नंतर तूम्हाला पश्चाताप होणार नाही ना, याचा आधी विचार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT