लाइफस्टाइल

अंबानींच्या एंटीलियामधील कचरा जातो कुठे?

शर्वरी जोशी

मुकेश अंबानी हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अंबानींकडे पाहिलं जातं. त्यामुळे मुकेश अंबानी व त्यांचं कुटुंबीय कायम चर्चेत असतात. अगदी त्यांच्या उद्योग समुहापासून ते त्यांच्या लाइफस्टाइलपर्यंत अनेक गोष्टींची नागरिकांमध्ये चर्चा रंगत असते. यात अंबानींचं घर कसं असेल, त्यांचा दिनक्रम कसा असेल हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आज मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ. यात त्यांच्या आलिशान घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते ते पाहुयात.

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये मुकेश अंबानी यांचं एंटीलिया हे २७ मजल्याचं आलिशान घर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडं घर म्हणून अंबानींच्या निवासस्थानाकडे पाहिलं जातं. अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या घरात कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावली जाते. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी खास तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

अंबानींच्या घरात जवळपास ६०० जण काम करत असून दररोज त्यांच्याकडे पै-पाहुण्यांची ये-जा सुरु असतो. त्यामुळे त्यांच्या घरात होणारा कचरादेखील तितक्याच मोठ्या स्वरुपाचा असतो. म्हणूनच, या कचऱ्याची विल्हेवाट अन्य कुठे बाहेर लावण्यापेक्षा ते घरातच लावतात.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एंटीलियामध्ये एक मिनी प्लाण्ट उभारण्यात आला आहे. खरं तर या वृत्ताला अंबानी कुटुंबाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, असा वीज निर्मितीचा प्लाण्ट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. त्यामुळे एंटीलियामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात असून हीच वीज अंबानी यांच्या घरासाठी वापरली जाते.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घरात हेल्थ स्पा, सलून, बॉलरुम, स्नो रूम, खासगी चित्रपटगृह, ३ स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत. तसंच या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील एवढी जागा असून या घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड्स देखील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT