remove the infection of skin home made some tips available in kolhapur 
लाइफस्टाइल

त्वचेवरील काही व्रणांपासुन त्रस्त आहात ? हे घरगुती उपाय नक्की वापरा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आजकाल प्रत्येकाला त्वचेची समस्या जाणवते. आपल्या त्वचेवरील डागांपासून अनेकजण चिंतित असतात, तर कुणी रंगापासून चिंतीत असतात. परंतु काही लोकांच्या त्वचेवर काही जुने व्रण असतात. त्यामुळे या समस्येपासून ही ते नाराज आहेत. आशा वेळी ते निशाण किंवा ती खूण कोणत्याही उपायांनी जात नसेल तर ते नुकसानदायक ठरु शकते. असे निशाण आपली सुंदरता कमी करण्याचे काम करतात. यापासून सुटकार मिळावा म्हणून लोक प्रयत्न करतात. काहीही करून ही खूण दिसली नाही पाहिजे. यासाठी विविध उपाय केले जातात परंतु काही खास फरक पडत नाही. पण आता तुम्ही याची काळजी करू नका कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यावर आमच्या कडे घरगुती उपाय आहेत..

एलोवैरा

संपूर्ण स्वास्थ्यसाठी एलोवेराची मदत होते. एलोवेराच्या मदतीने तुम्ही अनेक आजार दूर करू शकता. त्याचप्रमाणे एलोवेरा हा तुमच्या त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. हा तुमचा त्वेचेवरील डाग दूर करायला मदत करतो. एलोवेरामध्ये असे काही गुण आहेत, जे त्वचेवरील असे डाग गायब करायला आणि त्वचेचा रंग परत आणायला मदत करते. तुम्ही नियमित एलोवेरा जेल तुमच्या त्वचेवर लावले तर काही आठवड्यातच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल.

सफरचंद सिरका 

सफरचंदाचा सिरका हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्वचेवर होणाऱ्या कोणत्याही संक्रमनापासून वाचवण्याचं काम हे करते. तुमच्या त्वचेवर असलेली एखादी खूण दूर करायची असल्यास तुम्ही सफरचंदाच्या सिरकाचा वापर करू शकता. यामुळे तो डाग निघून जातो आणि तुमच्या त्वचेचा रंगही पहिल्यासारखा होतो. यामुळे तुमच्या त्वचेच्या असे डाग असलेल्या हिस्याला तुम्ही सफरचंदाचा सिरका लावून आधीसारखा व्यवस्थित करू शकता. रात्री झोपताना तुम्ही हे काम करू शकता आणि सकाळी कोमट पाण्याने ते स्वच्छ करु शकता

लवेंद्र आणि जैतनूच तेल

हेही तुमच्या त्वचेला स्वस्थ ठेवण्यासाठी आणि काही प्रकारांपासूनपासून दूर ठेवण्याचे काम करतात. जर तुमच्या त्वचेवर कोणतेही निशान असेल तर आता तुम्हाला चिंतीत व्हायची गरज नाही. या दोन्ही तेलांचे एकत्र मिश्रण करून तुम्ही काही मिनीट मालिश करुन तीस मिनिटानंतर लावलेले तेल धुवून स्वच्छ करू शकता.

लिंबू 

लिंबू तुमच्या स्वास्थ्यासाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला माहीत आहेच. तुमची इम्युनिटी सिस्टिम मजबूत ठेवण्यासाठी ज्या काही समस्या आहेत त्यांना दूर ठेवण्याचे काम लिंबू करतो. एवढेच नाही तर तुमच्या त्वचेवर असलेले काही निशान घेऊन तुम्ही चिंतीत असता, पण त्यासाठी तुम्ही लिंबूचा वापर करू शकता.  अशावेळी तुम्ही लिंबू कापून तो त्वचेवर घातल्यानंतर काही वेळाने ते धुवून स्वच्छ करू शकता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT