Saffron sakal
लाइफस्टाइल

Saffron Water Benefits: सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्या; आरोग्यासाठी मिळतील अनेक फायदे

केशर ताणतणाव कमी करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते.

Aishwarya Musale

सहसा तुम्ही दुधासोबत केशरचे सेवन करत असाल. पण, तुम्हाला माहिती आहे का की केशर पाण्यासोबतही सेवन केले जाऊ शकते. याचे आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

केशर हा जगातील सर्वात महाग मसाला आहे. कारण त्याच्या उत्पादनात खूप मेहनत घ्यावी लागते आणि फार कमी ठिकाणी त्याची लागवड होते. येथे आम्‍ही तुम्‍हाला केशरचा पाण्यासोबत वापर आणि फायद्यांविषयी सांगणार आहोत. जाणून घ्या ते पाण्यासोबत कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय आहेत?

केशर पाणी कसे बनवायचे

दोन ते तीन केशर घेऊन रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. रात्रीचे सेवन करायचे असल्यास सकाळी पाण्यात भिजत ठेवा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पाण्यात बदाम, वेलची, मध देखील वापरू शकता.

केशरमध्ये आढळणारे घटक

केशरमध्ये प्रथिने, मॅंगनीज, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. या कारणास्तव ते अनेक प्रकारच्या समस्यांसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही केशरचे पाणी रोज पिऊ शकता.

कॉफीपेक्षाही गुणकारी

कॉफीमध्ये कॅफीनचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी घातक आहे. अशा वेळी केशरचं पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगीही राहाल आणि कॉफीइतकाच हे पाणी पिऊन तुमचा दिवसही उत्साही राहील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT