लाइफस्टाइल

Astro Tips : यावेळी झोपल्याने घरात येते गरिबी, काय सांगितलं आहे शास्त्रात जाणून घ्या..

किती तास झोपावे, कोणत्या वेळी झोपायचे असे काही ठरलेल्या गोष्टी आहेत

सकाळ डिजिटल टीम

पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कारण झोपेमुळे आपला थकवा दूर होतो आणि शरीर ताजेतवाने दिसते. तुम्हाला जर अपुरी झोप मिळाली तर त्याचा कामावरही परिणाम दिसतो. तुम्हाला माहिती आहे का, की झोपण्याचेही काही नियम आहेत. किती तास झोपावे, कोणत्या वेळी झोपायचे अशा काही ठरलेल्या गोष्टी आहेत. त्यापद्धतीने झोपण्याचेही काही नियम आहेत.

याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यासोबतच धर्म शास्त्राच्या दृष्टीकोनातून हे अशुभ मानले जाते. आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये सायंकाळी झोपणे निषिद्ध मानले गेले आहे. शास्त्रात निषिद्ध वेळी झोपणाऱ्यांवर देवदेवता कोपतात, असे म्हटंले जाते. जाणून घेऊया सायंकाळी झोपण्याचे तोटे....

संध्याकाळी देवता पृथ्वीवर येतात त्यामुळे या वेळात जे लोक झोपलेले आढळतात त्यांचे भाग्य खराब असते, असे म्हटले जाते. जर एखादी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा गर्भवती महिला असेल तर हे लोक त्यांच्या सोयीनुसार दिवसाच्या कोणत्याही वेळी झोपू शकतात. अशा लोकांना कोणत्याही वेळी झोपल्याने कोणताही दोष वाटत नाही. परंतु जर एखादी व्यक्ती विनाकारण चुकीच्या वेळी झोपली तर ते शुभ मानले जात नाही.

शरीरावर चुकीचा परिणाम होतो

शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे झाले तर, सांयकाळी झोपल्याने आपली रात्रीची झोप आणि पचनसंस्थेची दिनचर्या खराब होते. जर आपण संध्याकाळी झोपलो तर आपल्याला रात्री चांगली झोप येत नाही. आपण रात्रभर बाजू बदलत राहतो. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुमचे शरीरही नीट काम करत नाही.

झोपण्याची योग्य वेळ आणि मार्ग जाणून घ्या..

झोपेचे संतुलन बिघडले तर शरीराचे नुकसान होऊ शकते. कमी झोपेमुळे अनेकदा लोकांचे लक्ष एका जागी राहत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दुपारी ४५ मिनिटे झोप घेतली तर ते शरीरासाठी चांगले असते. सकाळी लवकर उठून कामावर गेलेल्या व्यक्तीसाठीही हे आवश्यक आहे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. जास्त झोपेमुळे शरीरात अस्वस्थता, डोकेदुखी, सुस्तपणा येतो, ज्यामुळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगली हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

SCROLL FOR NEXT