Room Heater esakal
लाइफस्टाइल

Room Heater : रूम हीटर खरेदी करण्याचा प्लॅन करता आहात? या गोष्टी लक्षात ठेवा, होईल पैशांची बचत

खोलीचा आकार लहान असेल तर आपण इन्फ्रारेड किंवा हॅलोजन हीटर खरेदी करा

सकाळ डिजिटल टीम

Room Heater : थंडी दिवसेंदिवस वाढते आहे, अजून तीन महिने तरी थंडी कमी होणार नाही, आता घरात रूम हीटर घेण्याची गरज भासत असेलच, मग कोणतं रूम हीटर घेण्याचं प्लॅनिंग करता आहात? रूम हीटर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती असण गरजेच आहे कारण याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खोलीसाठी योग्य रूम हीटर खरेदी करू शकाल. योग्य हीटर वापरल्याने विजेचे बिलही कमी होईल आणि तुमचे खूप पैसे वाचतील.

या गोष्टी घ्या लक्षात

लहान खोलीसाठी इन्फ्रारेड हीटर

जर खोलीचा आकार लहान असेल तर आपण इन्फ्रारेड किंवा हॅलोजन हीटर खरेदी करू शकता. हे हीटर्स मोठ्या खोल्यांमध्ये वापरले जाऊ शकत नाहीत. किंमतीच्या बाबतीतही, या हीटर्सची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन बाजारातून इन्फ्रारेड हीटर खरेदी करू शकतात.

मध्यम आकाराच्या आणि मोठ्या खोल्यांसाठी हीटर्स

जर तुम्हाला मध्यम आकाराच्या खोलीसाठी हीटर घ्यायचा असेल, तर फॅन बेस हीटर हा उत्तम पर्याय असू शकतो. तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांच्यासाठीही ते सुरक्षित आहे. पण, जर खोलीचा आकार मोठा असेल तर तुम्ही Oil Filled रूम हीटर वापरू शकता.

वॉटेज आणि हीटिंग क्षमता तपासा

ऑप्टिमम हीटिंगसाठी रूम हीटरची वॅटेज आणि गरम क्षमता तपासा. जर तुमची खोली 100 स्क्वेअर फूट असेल, तर तुमच्यासाठी 750-व्हॅटचा हीटर योग्य असेल. याशिवाय यात तुम्ही हीटिंगच तापमान वाढवू किंवा कमी करू शकता.

या हिटर्समुळे वीज बिल कमी होईल

नवीन हीटर खरेदी करताना, त्यात बिल्ट-इन टाइमर आहे का हे चेक करा. हीटर बंद किंवा चालू करण्यासाठी तुम्ही टायमर सेट करू शकता. त्यामुळे वीज बिलही कमी होईल. वीज बिलांवर बचत करण्यासाठी हीटरच्या स्टार रेटिंगकडे लक्ष द्या. जास्त स्टार्स मुळे विजेचा वापर कमी होईल.

पोर्टेबल निवडा

जर तुम्हाला हीटर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवायचा असेल तर पोर्टेबल हीटर वापरा. अनेक हीटर्स चाकांसह येतात. जर तुमच्या घरात लहान मुल असतील तर हीटरमध्ये सेफ्टी जाळी आणि ग्रिड असण आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT