Rose Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Rose Day 2023 : न कोमेजणारं अन् हूबेहूब दिसणारं गुलाबाचं हे फूल पार्टनरला द्या, प्रेमाची आठवण कायम जवळ

आज आम्ही तुम्हाला अशाच काही आर्टिफिशीयल गुलाबांच्या फुलांबाबत सांगणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Rose Day 2023 : आज रोझ डे आहे. व्हॅलेंटाइन वीकचा हा पहिलाच दिवस. या दिवशी प्रेम युगूल एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात. फक्त प्रेम युगूलच नव्हे तर जवळच्या व्यक्तींनाही त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी बरेच जण गुलाबाचं फूल देतात. मात्र हे फूल कोमेजून जाऊ नये किंवा कायम तुम्हाला मिळालेलं गुलाबाचं फूल तुमच्या जवळ असावं, किंवा तुम्ही दिलेल्या व्यक्तीजवळ ते कायम असावं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही आर्टिफिशीयल गुलाबांच्या फुलांबाबत सांगणार आहोत.

फॅब्रिक आर्टिफिशीयल रोझ फ्लॉवर

हे फूल तुम्हाला अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध असेल. या फुलांची किंमत मार्केटमध्ये काही तफावतीतही असू शकते. ही फूलं तुम्हाला डेकोरेशनच्या शॉपमध्ये सहज मिळतील.आणि ही न कोमेजणारी फूलं असल्याने ज्या ही व्यक्तीस तुम्ही हे फूल द्याल त्याच्याजवळ ते कायम असेल.

आर्टिफिशीयल मल्टीकलर वेलवेट रोझेस (Artificial Multicolor velvet Roses)

हे फूल 30-40 रुपयांच्या किमतीत तुम्हाला ऑनलाइन किंवा कुठल्याही जनरल स्टोअर्समध्ये मिळेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राला किंवा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता अशा तुमच्या आप्तस्वकियांना तुम्ही ही मल्टिकलर फूलं देऊ शकता. तसेच तुम्ही याचा बूके बनवून सुद्धा देऊ शकता.

रेड पार्टी रोझ फोम फ्लावर (Red Party Rose Foam Flower)

या फुलांची किंमत साधारण ऐंशी ते शंभर रुपये असेल. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी या फुलांचे स्पेशल डेकोरेशनही करू शकता. तुम्हाला तुमची बेडरुम सजवायची असेल तर ही फूलं बेस्ट ठरतील. तसेच ती एका दिवसात न कोमेजणारी असल्याने तुम्ही संपूर्ण व्हॅलेंटाइन वीक ती घरात लावून ठेवू शकता. (Valentine Week)

प्लास्टिक आर्टिफिशीअल रोझ फ्लावर (Plastic Artificial Rose Flower)

ही फूलं तुम्हाला 75-80 रुपयांत मार्केटमध्ये मिळतील. ही फूलं सुद्धा दीर्घकाळ टीकणारी आहे. तुम्ही रोझ डे च्या निमित्ताने घराची सजावट करू शकता. तसेच जवळच्या व्यक्तीसही देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT