Dark Circle Solution esakal
लाइफस्टाइल

Dark Circle Solution : जाता जात नाहीत हट्टी डार्क सर्कल्स? ट्राय करा ऋजुता दिवेकर यांच्या खास टिप्स

Rujuta Diwekar : अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या डाएटिशियन म्हणून ऋजुता दिवेकर यांना ओळखलं जातं.

धनश्री भावसार-बगाडे

Rujuta Diwekar's Tips For Dark Circles In Marathi : डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्यच घालवते. चेहरा निस्तेज वाटतो. त्यामुळे कितीही छान तयार झालो तरी चेहरा डल वाटतो. अशा सगळ्या कटकटींतून तुम्हालाही जावे लागत असेल तर आता चिंता मुक्त व्हा.

प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकर या सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. त्वचा, सौंदर्याला पुरक अशा अनेक गोष्टींच्या टिप्स त्या शेअर करत असतात. त्यांनी हे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया

Dark Circle Solution

शेंगदाणे, गुळ, खोबरे

डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी शेंगदाण्यासोबत गुळ आणि खोबरे खावे. यासाठी एका वाटीत दुपारच्या नाश्त्यात थोडे शेंगदाणे, गुळ, खोबरे घेऊन खावे. त्यातील स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला ऊब मिळते. शिवाय हे केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरते. शरीरातील अनेक आजारांना टाळण्यासाठी हा उपाय गुणकारी आहे.

स्पेशल चहा

काळ्या वर्तुळांवर उपाय म्हणून एक स्पेशल चहा गुणकारी ठरेल. आले, तुळस, केशर टाकून चहा बनवा. त्यात साखरे ऐवजी मध घाला. हा चहा दिवसातून एकदा प्यावा. या चहामुळे शरीरात योग्य पोषणतत्वे मिळतात. चहातील केशरामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय तुळशी, आल्याचेही अनेक फायदे आरोग्याला मिळतात. रोज शक्य नसल्यास आठवड्यातून दोनदा सेवन करावे.

Dark Circle Solution

क्लिंझर वापरणे उपयुक्त

काळ्या वर्तुळांसाठी क्लिंझरचा वापर फार उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर चमकही येईल. यासाठी एका वाटीत बेसन आणि त्यात ताजे दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. काही दिवस कोणत्याही प्रकारचे फेसवॉश, साबण वापरू नका. यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारण्यास आणि डोळ्यांखालील काळे वर्तुळे कमी होतील.

दुपारी अर्धातास झोपावे

दिवेकर म्हणतात की, काळी वर्तुळं घालवण्यासाठी दुपारची झोप फार आवश्यक असते. रोज दुपारी अर्धातास झोप घ्या. तुमचा थकवा दूर करण्यासोबतच त्वचेलाही फायदा होईल. शरीराला, त्वचेला थकवा दूर करण्यासाठी आवश्यक पोषण या झोपेमुळे मिळेल. शरीरातील दोष दूर करण्यासाठी शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT